नकाशात दिलेल्या लाल रंगात सरासरी पर्जन्यमानापर्यंत कमी पाऊस दिसतो आहे. हवामान बदलण्याचे मुख्य कारण म्हणजे बंगालच्या उपसागरातील वादळे आपली दिशा बदलतात आणि त्यांच्या कमी काळाच्या प्रभावामुळे मध्य महाराष्ट्राला दुष्काळाचा सामना करावा लागतो.
पश्चिम जालना, धुळे, अकोला, बुलढाणा, वाशिम, कापूस, सोयाबीन, तूर, मका या पिकांवर जमिनीचा प्रचंड ताण आहे. पिके ६० दिवसाची झाली असून फुलावर आहेत. भविष्यातही जर असेच वातावरण राहीले, तर कोरडवाहू शेतकऱ्यांनी काय करावे. थोडा पाऊस येण्याची चिन्हे दिसता आहेत पण पाऊस आलाच नाही तर आपण खालील फवारण्या घेवू शकाल.
यूरिया १०० ग्रॅम + झिंक सल्फेट ५० ग्रॅम + बोरॉन २५ ग्रॅम + अॅस्प्रिना दोन गोळ्या ५०० मिग्रॅ (बारीक ठेचून) + क्लोरोपायरीफॉस ३० मिली.
१५ दिवसांनंतर प्रोफेनोफॉस ३० मिली + युरिया + ०:२५:३४ १०० ग्रॅम + ह्युमिक किंवा सागरिका ३० मिली + बोरॉन ५० ग्रॅम.
जमिनीत ओलावा टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करा.