Join us

Climate Change: जपानमध्ये ७.६ रिश्टर स्केलचा भूकंप, भारतावर काय होणार परिणाम?

By मुक्ता सरदेशमुख | Published: January 01, 2024 8:28 PM

त्सूनामी म्हणजे काय? त्सुनामीची निर्मिती कशी होते? जाणून घेऊया...

जपान देशाला त्सुनामीचा जोरदार तडाखा बसला आहे. ७.६ रिश्टर स्केलचा भूकंप आला असून नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जपानच्या पश्चिम किनारपट्टीवर मोठमोठ्या लाटा धडकू लागल्या आहेत. वारंवार येणाऱ्या भूकंपांचा येणाऱ्या काळात भारतालाही धोका असल्याचे हवामानतज्ञ प्रा किरणकुमार जाेहरे यांनी सांगितले.

दरम्यान, समुद्रीय हलचालींना या भागात वेग आला असून ५ मीटरहून उंच लाटांमुळे नागरीकांना धडकी भरली आहे. जपानमधील स्थानिक वेळेनुसार, सायंकाळी ४.३० च्या दरम्यान किनारपट्टी भागात त्सुनामीचा इशारा देण्यात आला. अर्ध्या तासाच्या अंतराने या भागात दोनदा भूकंपाचे हादरे बसल्याचे  सांगण्यात येत आहे. 

टेकटॉनिक प्लेट्स वर-खाली झाल्याने जपानमध्ये मोठी त्सुनामी आली आहे. तिथे लोकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वारंवार होणाऱ्या भूकंप भूस्खलन व त्सुनामीचा धोका भारतालाही आहे. उत्तराखंड किंवा हिमालयाच्या पायथ्याच्या भागात नैसर्गिक आपत्तींचा धोका येणाऱ्या काळात वाढणारा आहे. तापमानात आता होणारे वातावरणीय बदल हेही त्याचे स्वरूप आहे. हवेतील आर्द्रता वाढल्याने भूकंपाचे ढग तयार होत असल्याचे हवामानतज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी सांगितले.

या शतकाअखेरीस हिमनद्या नष्ट होण्याचा धोका टळेल! शास्त्रज्ञांचा निष्कर्ष काय?

भूकंप, चक्रीवादळे आणि समुद्राच्या तळाशी झालेल्या बदलांमुळे आलेल्या त्सुनामीचे प्रमाण, आणि तापमान वाढ अशा अनेक नैसर्गिक आपत्तींना जग वारंवार सामोरे जात आहे. लाखो लोकांना या जीवघेण्या नैसर्गिक बदलांमुळे निसर्गाच्या रौद्र रूपाची वारंवार अनुभूती मिळत आहे. लहान मुलांसह महिला, अपंग आणि वृद्धांसाठी जीवघेणी ठरणारी ही त्सूनामी म्हणजे काय? त्सुनामीची निर्मिती कशी होते? जाणून घेऊया...

त्सुनामी म्हणजे काय?

'त्सु' या जपानी शब्दापासून बनलेल्या या शब्दाचा अर्थ बंदर असा आहे. आणि 'नामी'याचा अर्थ लाट. ही लाट एक नसून समुद्राच्या तळाशी झालेल्या बदलांमुळे तयार झालेल्या लाटांची मालिका आहे. या लाटा प्रचंड महाकाय असतात. महासागरातून उसळून त्या जमिनीपर्यंत किंवा किनारपट्टीपर्यंत प्रचंड जोरात आदळल्या जातात.

हवामान बदल ही भविष्यातील धोक्याची घंटा!

त्सुनामी येण्याआधी काय होते?

त्सुनामी हा समुद्राच्या तळाशी झालेला भूकंप असतो. भूस्खलन, ज्वालामुखीचा उद्रेक अशा कारणांनी समुद्राखाली भूकंप होतो. जेंव्हा दोन भूगर्भाच्या आतले म्हणजेच समुद्र किंवा महासागरातील भूभाग एकमेकांच्या जवळ येतात तेंव्हा त्यांच्या घर्षणाने भूकंप होतो आणि त्सुनामी येते.समुद्राच्या खाली झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकानेही पाण्यात त्सुनामीच्या लहरी तयार होतात. किंवा समुद्रात उल्कापात झाल्यानंतरही त्सुनामीचा धोका असतो.

टॅग्स :हवामानजपान