गंगा, सिंधू आणि ब्रम्हपुत्रा यासह दक्षिण आशियातील प्रमुख नदी खोऱ्यांवर हवामान बदलाचा भयानक परिणाम जाणवणार असल्याचे एका नव्या अहवालावरून समोर आले आहे.
एलिव्हेटिंग रिव्हर बेसिन गव्हर्नन्स ॲंड कोऑपरेशन इन द एचकेएच रीजन या अहवालानुसार नदी खोरे व्यवस्थापनासाठी हवामान लवचिक दृष्टिकोनाची तात्काळ गरज असल्याचे सांगण्यात आले आहे.
दक्षिण आशिया आणि अग्नेय आशियाच्या अनेक नद्यांमध्ये गोड्या पाण्याचे स्त्रोत आहेत. हिमवर्षाव, हिमनद्या आणि पर्जन्यमानातून निर्माण होणारे पाणी आशियातील १० सर्वात मोठ्या नदी प्रणालींना अन्न पुरवतात. त्यामुळे सुमारे एक अब्ज लोकांची तहान भागते. त्यामुळे हवामान बदलांचा भयंकर परिणाम होणार आहे.
गंगेचे खोरे, भारतीय उपखंडातील ६०० दशलक्षाहून अधिक लोकांसाठी अनेकदा पवित्र आणि अत्यावश्यक मानले जाते. पर्यावरणीय आरोग्यावर परिणाम झाला आहे. सांडपाणी आणि औद्योगिक कचऱ्याच्या अंदाधुंद विसर्जनामुळे पाणी गंभीर प्रदूषित झाले आहे. ज्यामुळे मानवी आरोग्य आणि पर्यावरण या दोन्ही बाबतीत धोका वाढला असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
गंगेसारखेच पाकिस्ताना सिंधू नदीसह अफगाणिस्तान आणि चीनमधील २६८ दशलक्षाहून अधिक लोकांची जीवनरेखा हवामान बदल आणि नदीवर निर्माण परिणामामुळे तणावाखाली आहे.
सध्या हिमनद्या वितळण्याचे प्रमाण वाढत असून संपूर्ण प्रदेशात पाण्याच्या उपलब्धतेवर परिणाम होईल. नदीखोऱ्यात सध्या कोणतेही पाणी वळवता येत नसल्याने हवामान बदलाच्या अंदाजामुळे कोरड्या ऋतूतील प्रवाह कमी होण्याची शक्यता आहे. असे नोंदविण्यात आले आहे.