दि.११ फेब्रुवारी(रविवार) पर्यंत महाराष्ट्रात मध्यम थंडीचा दिलेला अंदाज कायम असुन ढगाळ वातावरणाने थंडी काहीशी कमी झाली आहे. सध्या कमाल व किमान दोन्हीही तापमाने सरासरीपेक्षा वाढीव असली तरी असली तरी रात्री व पहाटे थंडी ही जाणवतच आहे.
महाराष्ट्रात खालील दिलेल्या ठिकाणी व तारखेला ढगाळ वातावरणच राहून अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
1. म. महाराष्ट्र- मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगांव नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अशा एकूण १० -जिल्ह्यात दि.१० व ११ फेब्रुवारी (शनिवार व रविवार) ला.
2. मराठवाडा- मराठवाड्यातील सर्व ८ जिल्ह्यात दि. ९, १०,११ फेब्रुवारी (शुक्रवार ते रविवार)ला. 3. विदर्भ - विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यात दि.१० ते १४ फेब्रुवारी (शनिवार ते बुधवार)ला विशेषतः १० ते ११ फेब्रुवारी(शनिवार व रविवारी)'ह्या दिवशी पावसाची शक्यता अधिकच जाणवते.
मुंबईसह कोकणातील ७ जिल्ह्यात मात्र आकाश केवळ निरभ्रच राहून, तेथे केवळ सध्या जी काही थंडी पडत आहे, तशीच थंडी जाणवणार आहे. पावसाची शक्यता मात्र तेथे जाणवत नाही.
-माणिकराव खुळे, हवामानशास्त्रज्ञ (निवृत्त)आयएमडी, पुणे