Lokmat Agro >हवामान > Cold Wave In Maharashtra : राज्यात हुडहुडी कायम! कोणत्या जिल्ह्यात कमी तापमानाची नोंद; IMD रिपोर्ट वाचा सविस्तर

Cold Wave In Maharashtra : राज्यात हुडहुडी कायम! कोणत्या जिल्ह्यात कमी तापमानाची नोंद; IMD रिपोर्ट वाचा सविस्तर

Cold Wave In Maharashtra : Chills continue in the state! In which district low temperature was recorded; Read IMD report in detail | Cold Wave In Maharashtra : राज्यात हुडहुडी कायम! कोणत्या जिल्ह्यात कमी तापमानाची नोंद; IMD रिपोर्ट वाचा सविस्तर

Cold Wave In Maharashtra : राज्यात हुडहुडी कायम! कोणत्या जिल्ह्यात कमी तापमानाची नोंद; IMD रिपोर्ट वाचा सविस्तर

राज्यात गारठा वाढला असून गेल्या काही दिवसांपासून तापमानात अनेक बदल जाणवत आहे. पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.(Maharashtra Weather Update)

राज्यात गारठा वाढला असून गेल्या काही दिवसांपासून तापमानात अनेक बदल जाणवत आहे. पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.(Maharashtra Weather Update)

शेअर :

Join us
Join usNext

Maharashtra Weather Update : राज्यात थंडीचा कडका वाढला आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात थंडीने गारठले आहेत. काही जिल्ह्यात कमाल तापमान हे १० अंश सेल्सिअस पेक्षाही कमी झाले आहेत.

तर पहाटे आणि रात्री थंडीचा कडाका वाढताना दिसत आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत थंडीचा जोर फारसा कमी होणार नाही मात्र, काही दिवसांनी तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या काही दिवसांपासून वाढलेला थंडीचा कडाका आज (१४ डिसेंबर) पासून  थोडा कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

उत्तरेकडील राज्यांमध्ये कोरडे व थंड वारे वाहू लागले असून याचा परिणाम राज्याच्या हवामानावर झाला आहे. मध्य महाराष्ट्रातील जिल्हे थंडीने गारठले आहेत. तर पूर्वेकडील वाऱ्याचा प्रभाव येत्या दोन दिवसात कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात येत्या दोन दिवसात तापमान २ ते ३ अंशांनी वाढण्याची शक्यता आहे. पुण्याचे किमान तापमान रविवारी १२ अंश सेल्सिअसवरून मंगळवारपर्यंत १५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

तर राज्यात शुक्रवारी (१३ डिसेंबर) रोजी सर्वाधिक कमी तापमान धुळे येथे ६ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले तर त्या पाठोपाठ निफाड ७.२,  जळगाव ८.९, नाशिक ९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या लक्षद्वीप आणि त्याला जोडूनच मालदीव परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. येत्या २४ तासात चक्राकार वाऱ्यांची स्थिती बदलणार असून कमाल तापमानात १ ते २ अंशांनी वाढ होणार आहे.

महाराष्ट्रातील चारही उपविभागांमध्ये येत्या ४ ते ५ दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तसेच कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पुढील २ दिवस किमान तापमानात फारसा बदल होणार नसून त्यानंतर २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.

पुणे घाटपरिसरात पुढील २ दिवस आकाश मुख्यत: निरभ्र राहून सकाळी विरळ धुके पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर १५ ते १९ डिसेंबर या दरम्यान आकाश मुख्यत: निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. तर सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे. किमान तापमानात १ ते २ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी, धुळ्यात राज्यातील सगळ्यात कमी तापमानाची नोंद झाली. कमाल तापमान 6 अंश सेल्सियसची नोंद करण्यात आली. मागील काही दिवसांपासून राज्यात गारठा कायम असला तरी किमान तापमानात हळूहळू वाढ होत आहे.

वाऱ्यांमुळे दिवसा थंडी जाणवत आहे. तर, संध्याकाळी तापमानाचा पारा घसरत असल्याने गारठ्यात वाढ होत आहे. धुळे, परभणी, गडचिरोली आदी ठिकाणी किमान तापमान कमी झाल्याचे नोंदवले गेले.

महाबळेश्वर पेक्षाही मुंबई थंड

मुंबईत तापमानात मोठी घट झाली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे मुंबईचे तापमान घसरले आहे. सोमवारी मुंबईत महाबळेश्वर पेक्षाही कमी तापमानचा पारा होता. सोमवारी १३.७ अंशांवर असलेला तापमानाचा पारा आता थोडा वाढला आहे. तर पुढील ५ दिवस थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांना सल्ला

* हिवाळ्यात तुती बागेत बिहार हेरी या अळीचा प्रादूर्भाव होतो पानाच्या खालील बाजूस असंख्य अळ्या एकाच फांदीवर दिसतात. पानाहीत हीरतद्रव्य खाऊन फक्त पानाच्या शिरा शिल्लक ठेवतात.

* बदललेल्या हवामानानुसार दूध उत्पादनावरील पशुधन आणि अन्य प्राण्याच्या व्यवस्थापनावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे, दुधावरील जनावरांना योग्य प्रमाणात खनिज द्राव्याचे मिश्रण द्यावे.

Web Title: Cold Wave In Maharashtra : Chills continue in the state! In which district low temperature was recorded; Read IMD report in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.