Join us

विदर्भ, मध्य महाराष्ट्रात हुडहुडी; मराठवाड्यात पारा चढतोय, काय आहे आजचे तापमान?

By मुक्ता सरदेशमुख | Published: January 28, 2024 9:33 AM

किमान तापमानात १ ते २ अंशाची वाढ, राज्यात कुठे काय तापमान?

पश्चिम हिमालयीन व परिसरात वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्र गारठला आहे. मागील चार दिवसांपासून किमान तापमानात कमालीची घट झाल्याचे दिसून आले.  दरम्यान मराठवाड्यात किमान तापमान चढल्याचे आज दिसून आले. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हुडहुडी कायम आहे.

उत्तरेतील हे वारे ३१ जानेवारीपर्यंत सक्रीय राहणार आहेत. त्यानंतर राज्यातील तापमानही वाढण्यास सुरुवात होईल. दरम्यान, आज किमान तापमान मागील दोन दिवसाच्या तुलनेत काही अंशाने अधिक होते. जळगावात आज किमान तापमान १७ अंशावर गेले असून लातूर जिल्ह्यात आज सकाळी १९ अंश तापमानाची नोंद झाली.

नाशिक जिल्ह्यात मालेगावात १६ अंश तर कळवणमध्ये १३ अंशांची नोंद झाली. परभणीत ११ अंश तापमानाची नोंद झाली असून पुण्यात १४ अंशाच्या आसपास तापमान होते.

विदर्भात हुडहुडी

मागील चार दिवसांपासून विदर्भातील नागरिकांना हुडहुडी भरली असून तापमानाचा पारा घसरला आहे. नागपूरात आज १०.४ अंश तापमानाची नोंद झाली. तर अमरावती ११.९, अकोला ११.९ अंशांवर पोहोचले होते. वाशिम जिल्ह्यात आज १०.३ अंश तापमान होते.

मराठवाड्यात किमान तापमान वाढतेय..

मराठवाड्यात किमान तापमान हळुहळु वाढताना दिसत आहे. लातूर, धाराशीव जिल्ह्यात १९ अंशांपर्यंत किमान तापमान गेले आहे. हिंगोलीत १४.४ अंश तापमानाची आज नोंद झाली असून छत्रपती संभाजीनगरमध्ये १३ अंश तपामान नोंदवले गेले. तर जालना १४ अंशांवर पोहोचला होता.

तुमच्या जिल्ह्यात काय होते आज तापमान?

DISTRICT

STATION

TEMP MAX ('C)

TEMP MIN ('C)

AHMEDNAGAR

AHMEDNAGAR

29.7

13.0

AHMEDNAGAR

KOPERGAON

28.7

13.5

AHMEDNAGAR

RAHURI

30.9

12.6

AKOLA

AKOLA_AMFU

31.7

11.9

AMRAVATI

AMRAVATI

31.9

12.1

AURANGABAD

AURANGABAD_KVK

29.8

13.0

BEED

AMBEJOGAI

  

BHANDARA

BHANDARA

  

BHANDARA

SAKOLI_KVK

27.7

10.2

BULDHANA

BULDHANA_KVK

29.1

13.1

BULDHANA

LONAR

30.6

17.3

DHULE

DHULE

33.2

14.7

GADCHIROLI

GADCHIROLI_KVK

29.9

12.1

HINGOLI

HINGOLI

29.7

14.4

JALGAON

CHOPDA

  

JALGAON

JALGAON

31.9

17.0

JALNA

JALNA

30.2

14.6

KOLHAPUR

KOLHAPUR_AMFU

31.1

16.7

LATUR

LATUR

32.1

19.0

MUMBAI_CITY

MUMBAI_COLABA

29.9

23.5

MUMBAI_CITY

MUMBAI_SANTA_CRUZ

33.9

18.1

NAGPUR

NAGPUR

28.7

12.0

NAGPUR

NAGPUR_CITY

30.1

10.4

NAGPUR

NAGPUR_KVK

26.9

11.0

NANDED

NANDED

 

16.4

NANDURBAR

NANDURBAR_KVK

29.6

14.1

NANDURBAR

NAVAPUR

  

NASHIK

KALWAN

31.6

13.0

NASHIK

MALEGAON

30.6

16.0

OSMANABAD

OSMANABAD

33.6

19.4

OSMANABAD

TULGA_KVK

30.0

16.4

PALGHAR

PALGHAR_KVK

33.6

17.1

PARBHANI

PARBHANI_AMFU

29.6

11.3

PUNE

NIMGIRI_JUNNAR

29.8

13.9

PUNE

CAGMO_SHIVAJINAGAR

32.1

14.7

PUNE

CHRIST_UNIVERSITY_LAVASA

29.7

14.4

PUNE

CME_DAPODI

30.5

15.8

PUNE

DPS_HADAPSAR_PUNE

31.8

16.1

PUNE

INS SHIVAJI_LONAVALA

31.3

16.7

PUNE

KHUTBAV_DAUND

30.2

14.3

PUNE

LONIKALBHOR_HAVELI

29.3

12.1

PUNE

NARAYANGOAN_KRISHI_KENDRA

29.0

12.8

PUNE

NIASM_BARAMATI

29.9

14.3

PUNE

PASHAN_AWS_LAB

30.2

12.0

PUNE

RAJGURUNAGAR

32.2

14.8

PUNE

TALEGAON

30.9

 

RAIGAD

IIG_MO_ALIBAG

35.5

19.3

RAIGAD

KARJAT

35.7

15.4

RATNAGIRI

DAPOLI

36.0

17.1

RATNAGIRI

RATNAGIRI

  

SATARA

BGRL_KARAD

26.6

12.8

SATARA

SATARA

30.4

15.3

SINDHUDURG

DEVGAD

35.5

23.1

SOLAPUR

MOHOL_KVK

32.1

14.4

SOLAPUR

SOLAPUR

33.7

 

WARDHA

WARDHA

30.3

12.9

WASHIM

WASHIM_KVK

29.1

10.3

YAVATMAL

YAVATMAL

29.5

17.5

टॅग्स :तापमानहवामान