मागील आठवड्यापासून वातावरणात बदल झाला असून, दुपारच्या वेळी प्रखर ऊन तर सायंकाळी आणि पहाटेच्या वेळी वातावरणात गारवा जाणवत आहे. त्यामुळे ऑक्टोबरच्या तुलनेत विजेची मागणी कमी झाली असून, येणाऱ्या तीन-चार महिन्यात वीज बिल कमी येणार आहे.
सकाळच्या तापमानात घसरण झाल्याने थंडी जाणवायला सुरुवात झाली आहे. यामुळे विजेचा वापरही कमी झाल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. यावर्षी उन्हाळ्याप्रमाणे पावसाळ्यातहीच पावसाळ्यातही विजेची मागणी कमी झाली नव्हती. त्यातच ऑक्टोबर हिटमुळे फॅनचा वापर वाढला होता. तसेच उन्हाळ्याप्रमाणे कूलर लावण्याची वेळ आली. त्यामुळे या महिन्याचे वीजबिल वाढून आले. अनेकांना तर पावसाळा असूनही उन्हाळ्याप्रमाणे वीज बिल आले. आता मात्र वातावरणात बदल झाला असून, सायंकाळी आणि पहाटेच्या वतीने थंडी पडत आहे. त्यामुळे विजेचा वापर कमी होत आहे. परिणामी, येणाऱ्या तीन- चार महिन्यात वीज बिल कमी येणार आहे.
दिवसा गरमी, रात्री थंडी
हिंगोली शहर व जिल्ह्यात वातावरणात सतत बदल होत असून, सध्या ३२ अंशावर तापमान आहे. दुपारी प्रखर उन्हामुळे गरमी होत आहे. तर रात्री आणि पहाटेच्या वेळी थंडी जाणवत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी शेकोट्याही पेटत असताना दिसत आहेत.
जिल्ह्यात वीज मागणी घटली
उन्हाळ्यात विजेच्या मागणीत सातत्याने वाढ होते. आता मात्र वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे जिल्ह्यात वीज मागणी घटली आहे. पंखा, एसी, कूलरचा वापर कमी झाला आहे.
थंडीमुळे जिल्ह्यात वीजवापर घटला
सध्या हिवाळा म्हणजेच थंडीचा मौसम सुरु झाला आहे. थंडीमुळे सायंकाळी आणि पहाटेच्या वतीने गारवा जाणवत आहे. एसी, कूलर, पंखे सध्या बंदच आहेत. त्यामुळे वीजवापर घटल्याचे चित्र आहे.
ऑक्टोबरच्या तुलनेत सध्या तापमानास घसरण झाल्याने वातावरणात गारवा निर्माण होत आहे. त्यामुळे एसी कूलर, पंखा वापरण्याची गरज भासत नाही. परिणामी, मागील महिन्याच्या तुलनेत विजेच्या मागणीत बन्यापैकी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे थंडीच्या दिवसात बिल कमी येण्याची शक्यता आहे. - सचिन बेलसरे, प्र. उपकार्यकारी अभियंता, महावितरण