अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून पुढील १२ तासात तीव्र दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने जारी केले आहे.या वर्षातील हे दुसरे चक्रीवादळ असेल.
पश्चिम मध्य व नैऋत्य अरबी समुद्रावर या वादळाची तीव्रता वेगाने होत असल्याचे हवामान विभागाने सांगितले. आज दुपारपासून चक्रीवादळाचा वेग वाढणार असून तीव्रताही वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तेज चक्रीवादळाचं आज तीव्र चक्रीवादळात रुपांतर होऊन ओमान आणि शेजारील येमेनच्या दक्षिण किनार्याकडे सरकण्याचा अंदाज आहे.
अरबी समुद्रात तेज चक्रीवादळ, मुंबई हाय अलर्टवर, हवामान विभागाचे म्हणणे काय?
दरम्यान, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र विकसित झाल्याने आंध्र प्रदेश व तमिळनाडू किनारपट्टीवरील मच्छीमारांना समुद्रास जाण्यास जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. पुढील सहा तासात हा कमी दाबाचा पट्टा हळूहळू उत्तरेकडे सरकणार आहे.
चक्रीवादळाच्या या सर्व हालचालींमुळे देशातील अनेक भागांमध्ये काही ठिकाणी पाऊस पडला. यामध्ये मध्य महाराष्ट्र व कोकणाचा ही समावेश आहे. बहुतांश भागात ढगाळ वातावरण होते. तेज चक्रीवादळाचा महाराष्ट्र आणि गुजरात किनारपट्टीला सध्या कोणताही धोका नसल्याचे हवामान विभागाने वर्तवले आहे. पुढील १२ तासात चक्रीवादळाचा वेग वाढणार आहे. दरम्यान हवामान खात्याने मच्छीमारांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.