Join us

Dam Water: प्रजासत्ताकदिनी राज्यातील धरणसमुहात किती पाणी राहिलंय? 

By मुक्ता सरदेशमुख | Published: January 26, 2024 9:14 AM

मराठवाडा विभागात केवळ ३२.५३ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला असून भिषण पाणीटंचाईचे सावट गडद होत आहे.

राज्यातील एकूण २९९४ धरणांमध्ये आता ५६.१७ टक्के पाणीसाठा शिल्लक राहीला आहे. मराठवाडा विभागात केवळ ३२.५३ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला असून भिषण पाणीटंचाईचे सावट गडद होत आहे.

राज्यातील नागपूर, अमरावती,औरंगाबाद, नाशिक, पूणे व कोकण अशा सहा महसूल विभागात आता २२ हजार ७३८ दलघमी पाणीसाठा शिल्लक राहिल्याचे जलसंपदा विभागाने नोंदवले आहे.

जायकवाडीत ३९.८४ %

मराठवाड्यातील सर्वात मोठे धरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जायकवाडी धरणात आता केवळ ३९.८४ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मागील वर्षी याचवेळी हा साठा ८३.३४ टक्के होता. जायकवाडीत सध्या ८६४.८७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक राहीला आहे.दरम्यान, जायकवाडीमधून रब्बी हंगामासाठी दुसरे आवर्तन सोडण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

पुणे विभागात ५७.७५ टक्के पाणीसाठा

पुणे विभागातील ७२० धरणांमध्ये आता ५७.७५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.  राधानगरी धरणात सध्या १८९.०७ दलघमी पाणीसाठा शिल्लक राहिले आहे. पवना धरणात ५८.८५ टक्के पाणी शिल्लक आहे. तर खडकवासला धरणात ५८.१६ टक्के पाणी आहे.

नाशिक विभागात किती पाणीसाठा?

नाशिक विभागात आता ६४.३९ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला असल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले असून गेल्या वर्षी हाच पाणीसाठा ९४.६१ टक्के होता.

कोकणाची स्थिती काय?

कोकण विभागात एकूण ११ धरणे आहेत.ज्यात आता ६८.१० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.मागच्या वर्षी हा पाणीसाठा ७९.२० टक्के एवढा होता.

 

टॅग्स :धरणपाणीपाणीकपात