Join us

Dam Water Level: तापमान वाढीमुळे 'या' धरण प्रकल्पावर काय होतोय परिणाम वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 11:42 IST

Dam Water Level : बीड जिल्ह्यात मागील वर्षी चांगला पाऊस झाला असला तरी आता परिस्थितीत प्रचंड बदल पहावयास मिळत आहे. लहान-मोठ्या १४३ पाणी प्रकल्पामध्ये मार्च महिन्यातच केवळ ३० टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला असल्याची बाब समोर आली आहे. (Dam Water Level)

शिरीष शिंदे

बीड जिल्ह्यात मागील वर्षी चांगला पाऊस झाला असला तरी आता परिस्थितीत प्रचंड बदल पहावयास मिळत आहे. लहान-मोठ्या १४३ पाणी प्रकल्पामध्ये मार्च महिन्यातच केवळ ३० टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला असल्याची बाब समोर आली आहे.(Dam Water Level)

एका प्रकारे जिल्हा प्रशासनासह नागरिकांसाठी ही धोक्याची घंटा असून अनधिकृत पाणी उपश्यावर वेळीच प्रतिबंध आणणे आवश्यक आहे. जिल्ह्यात दर चार ते पाच वर्षाने दुष्काळ पडल्याचा अनुभव आहे. तसेच पाटोदा, आष्टी, शिरुर या तालुक्यातील गावे बहुतांशवेळा तहानलेली असतात.

निसर्गाचा समतोल बीड जिल्ह्यात ढासळलेला असल्याचे अनेकवेळा यापूर्वी समोर आलेले आहे. दरम्यान, मागच्या पावसाळ्यात चांगले पाऊस झाले असल्यामुळे जिल्ह्यातील लहान-मोठे १४३ पाणी प्रकल्प तुडुंब भरून वाहिले. (Dam Water Level)

परिणामी रब्बी हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला तर दुसऱ्या बाजूला ग्रामीण भागातील पाणीटंचाई व जनावरांचा पाणीप्रश्न मार्गी लागला होता. परंतु आता परिस्थिती बदलत चालली आहे.(Dam Water Level)

धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने जिल्ह्यावर पुन्हा पाणी टंचाईचे संकट घोंगावत आहे. त्याची गंभीर दखल सर्वांनी घेणे आवश्यक आहे. १० टक्के उन्हाळ्यात प्रत्येक आठवड्यात २ टक्के पाणीसाठा कमी होत जातो, उन्हाची तीव्रता वाढली तर ३ टक्के पाणी कमी होते. सध्या १४३ प्रकल्पांमाध्ये ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.(Dam Water Level)

एप्रिल व मे या दोन महिन्यांत २० टक्के पाणीसाठा कमी होऊन जून महिन्यात सर्व पाणी प्रकल्पांमध्ये १० टक्केच पाणीसाठा शिल्लक राहील, असा अंदाज आहे.

झपाट्याने होतेय बाष्पीभवन

* फेब्रुवारी महिन्यापासूनच कडाक्याचे ऊन पडण्यास सुरुवात झाली आहे. आता उन्हाळा सुरू असल्याने पाणी प्रकल्पातील साठा बाष्पीभवनामुळे वेगाने कमी होत चालला आहे.

* कमाल तापमान ३८ ते ४० अंशाच्या आसपास असल्याने झपाट्याने बाष्पीभवन होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास जलसंकट निर्माण होऊ शकते, त्यामुळे आतापासून उपाययोजना करणे आवश्यक आहे.

* तीन महिन्यांच्या कालावधीत १०० टक्क्यांहून प्रकल्प ३० टक्क्यांवर आले आहे. त्यामुळे आगामी काळात अवैध पाणी उपसा यावर वेळीच प्रतिबंध आणणे आवश्यक आहे.

१०० टक्क्यांहून ३० वर जिल्ह्यात पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात परतीचा पाऊस पडतो असा अनुभव आहे, मागच्या वर्षी तसेच झाले होते.अगदी सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाऊस पडत असल्याचे पाहावयास मिळाले. त्यानंतर सर्व प्रकल्प ओसंडून वाहले. मात्र, आता सर्वच धरणांतील पाणीपातळी खालावत चालली असल्याचे दिसून येत आहे.

...असा आहे उपलब्ध पाणीसाठा

प्रकल्पाचे नावपाणी टक्केवारी
माजलगाव प्रकल्प३३.८१
बिंदुसरा प्रकल्प४८.६१
सिंदफना प्रकल्प१८.१६
महासांगवी प्रकल्प४.९३
कडा प्रकल्प१६.२७
रुटी प्रकल्प२०.२२
तलवार प्रकल्प२१.४४
कांबळी प्रकल्प१७.८६

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यावर येतंय मोठं संकट; काय आहे आजचा रिपोर्ट वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रपाणीपाणीकपातधरण