Join us

Dam water storage: उजनीसह राज्यातील या २६ धरणांचा पाणीसाठा शून्य टक्क्यांवर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 16:26 IST

Dam water storage in Maharashtra's these dams indicates severe drought महाराष्ट्रातील या धरणांचा पाणी साठा शून्य टक्क्यांवर आला असून दुष्काळाची दाहकता वाढली आहे.

राज्यात उजनी धरणातीलपाणीसाठा शून्याकडून मायनसकडे (Ujani dam water storage) चालला असताना अनेक ठिकाणच्या धरणांची पातळी शू्न्यावर येऊन पाण्याचा खडखडात झाला आहे. विशेषत: लघु आणि मध्यम प्रकल्पांचा शून्य पाणीपातळीत समावेश असून ग्रामीण भागात पाणीटंचाई आणखी तीव्र झाली आहे.

सध्या राज्यातील एकूण धरण पाणीसाठा २२.६४ टक्के इतका (dam water storage in Maharashtra) असून मागच्या वर्षी याच काळात राज्यातील धरणांमध्ये ३१.४१ टक्के पाणीसाठा होता. सध्या मराठवाड्यात सर्वात कमी पाणीसाठा आहे. मराठवाड्यातील धरणांमध्ये आजच्या तारखेला केवळ ९.०६ टक्के पाणीसाठा उरलाय. गेल्या वर्षी हा पाणीसाठा ३५.३३ टक्के इतका होता.

या धरणांतील पाणीसाठा शून्यावर

नागपूर प्रदेश१. खडकपूर्णा (बुलडाणा)

छत्रपती संभाजीनगर प्रदेश१. बोरगाव अंजनपूर (बीड)२. रोशनपुरी (बीड)३. सिरस मार्ग (बीड)४. वांगदरी (बीड)५. सिद्धेश्वर (हिंगोली)६. ढालेगाव (नांदेड)

७. किल्लारी (धाराशिव)८. लिंबाळा (धाराशिव)९. निम्न तेरणा (धाराशिव)१०.मदनसुरी (धाराशिव)११.सिना कोळेगाव (धाराशिव)१२.तागरखेडा (धारशिव)

१३. बिडगीहाळ (लातूर)१४. कारसा पोहरेगाव (लातूर)१५. नागझरी (लातूर)१६. शिवनी (लातूर)१७. टाकळगाव देवळा (लातूर)

१८. निम्न दुधना (परभणी)

नाशिक प्रदेश१९. चणकापूर (नाशिक)२०. मुकणे (नाशिक)२१. पुणेगाव (नाशिक)२२. तिसगाव (नाशिक)

पुणे२३. पिंपळगाव जोगे (पुणे)२४. लोणावळा टाटा (पुणे)२५ भीमा-उजनी (सोलापूर)

टॅग्स :धरणपाणीपाणी टंचाईपाणीकपात