राज्यात थंडीचा जोर आता ओसरु लागला आहे. तापमानात हळूहळू वाढ होऊ लागली असताना उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. दरम्यान राज्यातील धरणांमध्येपाणीसाठा कमी होत असून येत्या काळात गंभीर पाणीटंचाईचे सावट गडद होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
राज्यातील ६ महसूल विभागात असणाऱ्या लहान, मध्यम व मोठ्या २ हजार ९९४ धरणांमध्ये आता ५३.६७ टक्के पाणी उरले आहे. हा पाणीसाठा मागील वर्षी ८०.०९ टक्के एवढा होता.
सहा महसूल विभागात काय स्थिती?
जलसंपदा विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, पुणे, कोकण या विभागात आता एकूण २१ हजार ७२८ द.ल.घ.मी. पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
जायकवाडीतून दोन्ही कालव्यांत रब्बीसाठी सोडले पाणी
मराठवाड्यात सर्वात कमी पाणीसाठा
मराठवाड्यातील एकूण ९२० धरणांमध्ये आता केवळ ३१.३२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. इतर ५ महसूल विभागाच्या तुलनेत धरणसाठ्यात राहिलेला हा सर्वात कमी पाणीसाठा आहे. मागील वषी राहिलेल्या पाणीसाठ्यापेक्षा सुमारे ४८.४१ टक्क्यांची यंदा तूट आहे.
मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणात आज दि ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ३९.८४ टक्के पाणी शिल्लक आहे. ८६४.८७ दलघमी पाणीसाठा आता जायकवाडीत उरला आहे. हिंगोलीच्या सिध्देश्वर आणि येलदरी धरणात आता ३४.५२ व ५३.८७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
Budget 2024: पर्यावरणासाठी यंदाच्या बजेटमध्ये काय तरतूदी?
नाशिक विभागाची काय स्थिती?
नाशिक विभागातील ५३८ धरणांमध्ये आता ५६.३७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच दिवशी तो ८५.६८ टक्के शिल्लक होता.
दारणा धरणसमुहात आता ५१.३६ टक्के पाणी शिल्लक आहे. तर किडवा धरणात ४१.४८ टक्के पाणीसाठा उरला आहे. गंगापूर धरण ६६.०९ टक्के भरले असून मुकणे धरणात ५५.२० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
उर्वरित विभागात काय आहे पाण्याची पातळी?