Join us

Dam Water storage: राज्यातील धरणसमुहांमध्ये आज एवढा पाणीसाठा शिल्लक, जाणून घ्या

By मुक्ता सरदेशमुख | Published: January 18, 2024 12:57 PM

राज्यातील ६ विभागातील २ हजार ९९४ धरणांमध्ये किती पाणी शिल्लक?

राज्यभरातील २ हजार ९९४ मोठ्या, मध्यम आणि लहान धरणांमध्ये सध्या ५७ % टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षीच्या तुलनेत धरणांमध्ये २८.१३ टक्क्यांची तूट आहे.

राज्यात सध्या बहुतांश  धरणांतून रब्बी पिकांसाठी पाण्याची आवर्तनं सोडण्यात येत आहेत. राज्यातील धरणसमुहात आज ५७  टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील सहा विभागातील एकूण धरणांमध्ये २३ हजार ०७४ द.ल.घ.मी. उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. 

संबंधित वृत्त-धरणातून पाणी सोडताना टीएमसी अन् सोडल्यावर क्यूसेक! असे का?

जायकवाडीत ४०.९१ टक्के

औरंगाबाद विभागात एकूण ९२० धरणे आहेत.मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या लहान मोठ्या व मध्यम प्रकल्पांमध्ये आज २४३६ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. निम्न दुधना धरणात आज १७.८१ टक्के पाणीसाठा उरला आहे. तर जायकवाडी जलाशयात आज दिनांक १८ जानेवारी रोजी, सकाळी ८.०३ वाजता ४०.९१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

नाशिक विभागात किती पाणी?

नाशिक विभागातील एकूण ५३७ धरणांमध्ये सध्या ६१.२० टक्के पाणी शिल्लक आहे. गंगापूर धरणात ६७.३१ टक्के उपयुक्त पाणीसाठा असून दारणा समुहात ५२.८१ टक्के पाणी शिल्लक आहे.

पुण्यातील धरणांमध्ये किती पाणी?

पुणे विभागातील ७२० धरणांमध्ये सध्या ८ हजार ८६१ दशलक्ष घनमीटर पाणी शिल्लक असून एकूण ५८.०८ टक्के पाणी उरले आहे.पवना धरण सध्या ६०.९१ टक्क्यांवर असून खडकवासला ५४.३७%,पानशेत ८३.७९%, मुळशी धरण ७३.२२ टक्के भरलेले आहे.जाणून घ्या कोणत्या विभागात किती पाणीसाठा शिल्लक..

 

उजनी धरणात उपयुक्त पाणीसाठा केवळ दीड टीएमसी शिल्लक

सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरलेले उजनी पुढील चार ते पाच दिवसांत २२ ते २३ जानेवारीदरम्यान मृतसाठ्यात जाणार आहे. गतवर्षीचा तुलनेत यंदा उजनी चार महिने अगोदर मृतसाठ्यात जाणार आहे. त्यामुळे शेतीसाठी पुढचे सहा महिने अडचणीचे ठरणार आहेत.

निळवंडे धरणातून आवर्तन सोडले

रब्बी हंगामातील सिंचन व बिगर सिंचन आवर्तनासाठी सोमवार दि.१५ रोजी सकाळी  सहा वाजता(६.००वा.) निळवंडे धरणातून  सुमारे १४०० क्युसेक्स इतका पाणी विसर्ग  प्रवरा नदी मध्ये सोडण्यात आलेला आहे.     

टॅग्स :धरणपाणीपाणीकपातमराठवाडानाशिक