Join us

Dam water storage Maharashtra: पावसाची ओढ, राज्यातील धरणांमध्ये किती टक्के पाणीसाठा उरलाय?

By मुक्ता सरदेशमुख | Published: June 19, 2024 11:21 AM

जलसंपदा विभागाची आकडेवारी

राज्यात पावसाने ओढ दिली असून मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाने ब्रेक घेतल्याचे चित्र आहे. दरम्यान, राज्यातील धरणांमध्ये किती पाणीसाठा उरलाय? जाणून घ्या..

राज्यात १९.९३ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मराठवाड्यात ९.२६ टक्के पाणीसाठा उरला असून पुणे विभागात १२.८८ टक्के पाणी शिल्लक आहे. नाशिक विभागात २२.५४ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

कोकणात सध्या पाऊस सुरु झाला असून कोकण विभागातील धरणांमध्ये २८.७१ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. अमरावती, नागपूर विभागातील धरणांमध्ये ३६.७९, ३५.७७ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

टॅग्स :धरणपाणीपाणी टंचाईमोसमी पाऊसपाऊस