Lokmat Agro >हवामान > Dam Water Storage पश्चिम महाराष्ट्रातील अनेक धरणांचा पाणीसाठा खालावला

Dam Water Storage पश्चिम महाराष्ट्रातील अनेक धरणांचा पाणीसाठा खालावला

Dam Water The water storage of many dams in western Maharashtra has decreased | Dam Water Storage पश्चिम महाराष्ट्रातील अनेक धरणांचा पाणीसाठा खालावला

Dam Water Storage पश्चिम महाराष्ट्रातील अनेक धरणांचा पाणीसाठा खालावला

सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाने इतिहासात प्रथमच वजा ६० टक्के पाणी पातळी घटली असून, पश्चिम महाराष्ट्रातील भीमा व कृष्णा खोऱ्यातील धरणांची स्थितीही पावसाळ्याच्या सुरुवातीला चिंताजनक आहे.

शेअर :

Join us
Join usNext

सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाने इतिहासात प्रथमच वजा ६० टक्के पाणी पातळी घटली असून, पश्चिम महाराष्ट्रातील भीमा व कृष्णा खोऱ्यातील धरणांची स्थितीही पावसाळ्याच्या सुरुवातीला चिंताजनक आहे.

१ जून रोजी भीमा व कृष्णा खोऱ्यातील अनेक धरणांची स्थिती शून्य टक्केवारीपर्यंत खाली गेली आहे, तर भीमा खोऱ्यातील पिंपळगाव, माणिकडोह, वडज, डिंभे, घोड, विसापूर, चिल्हेवाडी, कळमोडी, चासकमान, वडिवळे, आंध्रा, कासारसाई, टेमघर, खडकवासला, गुंजवणी, निरा देवघर या धरणातील उपयुक्त पाणीसाठा १ टीएमसीपेक्षा कमी राहिला आहे.

कृष्णा खोऱ्यातील कासारी, धोम बलकवडी, उरमोडी या धरणांतील उपयुक्त पाणीसाठा १ टीएमसीपेक्षा कमी राहिला आहे. उजनीसह येरळवाडी, धोम बलकवडी, पिंपळगाव, घोड, विसापूर या धरणातील पाणी पातळी वजापर्यंत घटली आहे.

भीमा व कृष्णा खोरे मान्सूनचा आगमनाची वाट पाहात असून, कोयना धरणात १२.४६, तर उजनी धरणात ३१.९७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहीला आहे.

एकूण टीएमसी व कंसात टक्केवारी

भीमा खोऱ्यातील धरणांची स्थिती
■ पिंपळगाव ०० (००.००)
■ माणिकडोह ०.२१ (२.०३ )
■ येडगाव १.०६ (५४.६१)
■ वडज ०.०६ (६.३४)
■ डिंभे ०.४० (३.१९)
■ घोड ०.० (०.००)
■ विसापूर ०.०२ (२.३८)
■ चिल्हेवाडी ०.१० (१२.६७)
■ कळमोडी ०,२८ (१८.७५)
■ चासकमान ०.५४ (७.०९)
■ भामा असखेड १.२४ (१६.१७)
■ वडिवळे ०.४८ (४५.०१)
■ आंध्रा ०.८४ (२८.६८)
■ पवना २.०१ (२३.६२)
■ कासारसाई ०.१६ (२९.०८)
■ मुळशी २.९२( १४.४७)
■ टेमघर ०.१२ (३.११)
■ वरसगांव २.४३ (१८.९५)
■ पानशेत १.८२ (१७.०८)
■ खडकवासला ०.७२ (३६.६५)
■ गुंजवणी ०.५९ (१५.८८)
■ निरा देवघर ०.९६ (८.१९)
■ भाटघर २.२ (८.५८)
■ वीर १.३३ (१४.१३)
■ नाझरे ००,०० (००,00)
■ उजनी वजा ३१.९७ (५९.६७)

कृष्णा खोऱ्यातील धरणांची एकूण टीएमसी (कंसात टक्केवारी)
■ कोयना १२.४६ (१२.४४)
■ धोम २.८७ (२४.५३)
■ कन्हेर १.२० (१२.५०)
■ वारणावती ४.१५ (१५.०६)
■ दुधगांगा २.२२ (९.२५)
■ राधानगरी १.४८ (१९.०३)
■ तुळशी १.०७ (३२.९९)
■ कासारी ०.८० (२८.९१)
■ पाटगांव १.२५ (३३.७३)
■ धोम बलकवडी ००.०० (२.९८)
■ उरमोडी ०.४३ (४.५०)
■ येरळवाडी वजा ०.३९ (वजा ५६.७३)
■ तारळी १.४३ (२४.४२)

गेल्या चार वर्षांतील १ जून रोजी उजनी धरणाची टक्केवारी
■ वजा ५९.६७ - २०२४
■ वजा २३.८३ - २०२३
■ अधिक १.५१ - २०२२
■ वजा २२.३१ - २०२१

Web Title: Dam Water The water storage of many dams in western Maharashtra has decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.