Join us

धोम-बलकवडी कालव्याला सुटलं पाणी; शेतकरी आनंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 9:52 AM

अखेर काल धोम-बलकवडी धरणातून २०० क्यूसेकने पाण्याचे आर्वतन सुटल्याने वीसगाव आंबावडे खोरे, खंडाळा, फलटण तालुक्यातील पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी मोठा फायदा होणार असल्यामुळे शेतकरी आनंदात आहेत.

आंबवडे व वीसगाव खोऱ्यातील पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. त्यामुळे धोम-बलकवडीचे आवर्तन सोडण्याची मागणी शेतकरी करीत होते.

अखेर काल धोम-बलकवडी धरणातून २०० क्यूसेकने पाण्याचे आर्वतन सुटल्याने वीसगाव आंबावडे खोरे, खंडाळा, फलटण तालुक्यातील पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी मोठा फायदा होणार असल्यामुळे शेतकरी आनंदात आहेत.

तालुक्याचा वीसगाव आंबवडे भाग पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतो. मात्र, पट्टयातील बहुतांशी भाग हा खडकाळ व उताराचा असल्याने पावसाचे पाणी काही दिवसांतच वाहून जाते. त्यामुळे दरवर्षी वीसगाव खोऱ्यातील दहा ते पंधरा, तर चाळीसगाव खोऱ्यातील बहुतांशी गावांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागतात.

यंदा पावसाचे प्रमाणही कमी झाले होते. त्यामुळे ओढे-नाले, विहिरींना पाणी कमी होते. त्यातच यंदा कडक उन्हाळा पडल्याने एप्रिलच्या सुरुवातीलाच विहिरींनी तळ गाठल्याने मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत होते.

पाणीटंचाईमुळे जनावरांच्या हिरव्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याने जनावरे जगवायची कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे. त्याबरोबरच डोंगररांगांमधील पडण्याचे जलस्त्रोत आटल्याने वन्यप्राण्यांची भटकंती मानववस्तीकडे तसेच शिवाराकडे अन्नपाण्याच्या शोध सुरू होता.

अखेर काल संध्याकाळी धोम बलकवडी धरणाचे आवर्तन सुटले आणि पाण्याचा काळ हटला उन्हाची तीव्रता जास्त असल्याने पाणीपातळी घटली आहे. मात्र, भोर तालुक्याच्या वीसगाव चाळीसगाव खोऱ्याच्या डोंगररागांच्या कडेने धोम-बलकवडी धरणाचा उजवा कालवा पूर्वेकडे गेला आहे.

या धरणाच्या कालव्याला रब्बीतील दुसरे आवर्तन सोडले. यामुळे उन्हाळ्यातील पाण्याचा प्रश्न मिटला असल्याचे पळसोशी येथील शेतकरी हनुमंत म्हस्के व निळकंठ येथील शेतकरी श्यामराव जेधे यांनी सांगितले.

विहिरींमधील पाणीपातळी वाढलीआंबवडे व वीसगावमधून जाणाऱ्या धोम-बलकवडी कालव्याला २०० क्युसेकने पाणी सुटल्याने खानापूर, जेधेवाडी, पोळवाडी, निळकंठ गोकवडी, नेरे बालवडी, आंबाडे, वरोडी खुर्द, चरोडी बु. वरोडीडावमुख, पाले, पळसोशी धावडी, बाजारवाडी, हातनोशी, रामोसवाडी या गावांतील पिण्याच्या पाण्याच्या विहिरीला पाणी वाढल्यामुळे मागील महिनाभरापासून वीसगावातील सुरू असलेली पाणीटंचाई कमी होऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. तर खंडाळा, फलटणलाही पिण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला.

अधिक वाचा: Koyna Dam कोयनेतून सांगलीची सिंचनासाठी मागणी झाली कमी; धरणात उरला इतका पाणीसाठी

टॅग्स :शेतकरीशेतीपाणीधरणफलटण