Join us

Dimbhe Dam : पावसाचा जोर वाढल्याने डिंभे धरण पुन्हा तुडुंब मोठा विसर्ग सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 10:56 AM

डिंभे धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पर्जनवृष्टी होत आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात परतीच्या पावसाचा जोर वाढल्याने आजच्या तारखेस धरणात शंभर टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

कांताराम भवारीडिंभे: डिंभे धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पर्जनवृष्टी होत आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात परतीच्या पावसाचा जोर वाढल्याने आजच्या तारखेस धरणात शंभर टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

परतीच्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढल्याने धरणातून एक हजार क्युसेकने पाणी नदीपात्रात सोडावे लागले आहे. डिंभे धरणातून वाहून जाणारे पाणी हा या भागात कळीचा मुद्दा ठरत आहे.

डिंभे धरणातून वाहून जाणारे पाणी धरणाच्या आतील बाजूस पाणी वाहून जाणाऱ्या पातळीवर बोगदा पाडून शेजारच्या तालुक्यातील माणिकडोह धरणात सोडण्याचे प्रस्तावित होते.

मात्र यात पुन्हा बदल होऊन धरणाच्या तळाशी बोगदा पाडून हे पाणी माणिकडोह धरणात सोडण्यात यावे या मागणीमुळे आंबेगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

तळाशी बोगदा पाडून हे वळविल्यास उन्हाळ्यामध्ये धरणातील सर्व पाणी संपुष्टातील येईल व आंबेगाव तालुक्यात पुन्हा दुष्काळी स्थिती निर्माण होईल, या कारणामुळे डिंभे धरणातून पाणी वळविण्यास आंबेगाव तालुक्यातील जनतेचा तीव्र विरोध आहे.

दुसरीकडे या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ज्या भूमिपुत्रांच्या जमिनी गेल्या त्या भागाला अजूनही शेतीसाठी पाणी उपलब्ध करून दिले नाही. गेले ३५ वर्षापासून या भागातील शेतकरी आमच्या शेतीला डिंभे धरणातून पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी करत आहेत. मात्र त्यांच्या मागणीला आजपर्यंत तरी यश आले नाही.

धरणाची पाणी पातळी ७१७.१४ वर कायम■ आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात मागील दोन दिवसांपासून परतीच्या पावसाचा जोर वाढला आहे. यंदा धरण १०० टक्के भरल्यापासून धरणाची पाणी पातळी ७१७.१४ वर कायम ठेवण्यात आली आहे.■ मात्र १५ व १७ ऑक्टोबर रोजी अनुक्रमे ५१ मीमी व ५ मीमी एवढा पाऊस झाल्याने धरणात जमा होणारे अतिरिक्त्त पाणी बाहेर सोडण्यासाठी १००० क्युसेकने पाणी घोडनदी पात्रात सोडावे लागले आहे.■ दरम्यान, १५ ऑक्टोबर रोजी रात्री ९.३० वाजता सुरु केलेला सांडवा गुरुवारी सकाळी १०.३० वाजता बंद केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शेतकऱ्यांत आनंदडिंभे धरण यंदा मागील वर्षीच्या तुलनेत लवकर भरले आहे. आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यासह नगर, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेले धरण यंदा लवकर भरल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

टॅग्स :धरणपाणीपाऊसआंबेगावजुन्नरदुष्काळशेतकरीशेती