Join us

Warna & Koyna Dam Water Level: वारणा व कोयना धरणांतून विसर्ग सुरू, जाणून घ्या कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील धरणांची पाणीपातळी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 12:54 PM

Warna & Koyna Dam Water Level: 'वारणा', 'कृष्णा' नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे. सांगली आर्यविन येथे कृष्णेची पाणीपातळी २७ फूट ६ इंचावर गेली आहे.

सांगली : कोयना धरणात ६४.५५ टीएमसी, तर वारणा २९.९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून एक हजार ५० क्युसेक, तर वारणा (चांदोली) धरणाचे दोन वक्राकार दरवाजे उचलून २ हजार १५२ क्युसेक, तर वीजनिर्मिती केंद्रातून १ हजार ६४८ क्युसेक असा एकूण ३ हजार ८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग मंगळवापासून सुरू आहे.

यामुळे 'वारणा', 'कृष्णा' नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे. सांगली आर्यविन येथे कृष्णेची पाणीपातळी २७ फूट ६ इंचावर गेली आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस असून २४ तासांत कोयनेला १६४, तर नवजा येथे १४५ मिलिमीटर पर्जन्यमान झाले

कोयना आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरूच असून, धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. शिराळा तालुक्यातही जोरदार पाऊस सुरू आहे. गेल्या चार दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे वारणा नदीकाठावर पूरस्थिती निर्माण झाली आहे. याशिवाय धरणातून पाणी सोडल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून नदीकाठावर सतर्कतेचा इशारा दिला आहे.

जिल्ह्याच्या बहुतांश भागात मंगळवारी दिवसभर पावसाची उघडझाप सुरूच राहिली. गेल्या चार दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे वारणा नदीकाठावर पूरस्थिती निर्माण झाली आहे. याशिवाय धरणातून पाणी सोडल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून नदीकाठावर सतर्कतेचा इशारा दिला आहे. दुष्काळी तालुक्यातही पावसाचा जोर कायम आहे.

धरणातील पाणीसाठा

धरणआजचा साठाक्षमता
कोयना६४.५५१०५.२५
धोम०६.६३१३.५०
कन्हेर०६.१११०.१०
वारणा२८.१५३४.४०
दूधगंगा१६.७२२५.४०
राधानगरी०७.३६०८.३६
तुळशी०२.६२०३.४७
कासारी०२.०४०२.७७
पाटगाव०३.२६०३.७२
धोम०२.०३०४.०८
उरमोडी०४.१००९.९७
तारळी०३.४२०५.८५
अलमट्टी९१.८३१२३.०८

अधिक वाचा: Ujani Dam Water Level: आठ दिवसांत उजनी मृत साठ्यातून बाहेर येण्याची शक्यता वाचा सविस्तर

टॅग्स :धरणकोयना धरणपाणीपाऊससातारासांगलीकोल्हापूरनदी