Lokmat Agro >हवामान > Doodhaganga Dam : यंदा दूधगंगा धरणात 'इतके' टक्के पाणी ; वाचा सविस्तर

Doodhaganga Dam : यंदा दूधगंगा धरणात 'इतके' टक्के पाणी ; वाचा सविस्तर

Doodhaganga Dam: 'So much' percent water in Doodhaganga Dam this year; Read in detail | Doodhaganga Dam : यंदा दूधगंगा धरणात 'इतके' टक्के पाणी ; वाचा सविस्तर

Doodhaganga Dam : यंदा दूधगंगा धरणात 'इतके' टक्के पाणी ; वाचा सविस्तर

दूधगंगा धरणात पाणी किती साठविण्यात आले आहे. वाचा सविस्तर (Doodhaganga Dam)

दूधगंगा धरणात पाणी किती साठविण्यात आले आहे. वाचा सविस्तर (Doodhaganga Dam)

शेअर :

Join us
Join usNext

Doodhaganga Dam :

सोळांकुर :

दूधगंगा धरणाची गळती पाहता सुरक्षिततेच्या कारणामुळे पूर्ण क्षमतेने पाणी साठवले जाणार नसल्याचे यापूर्वीच पाटबंधारे विभागाने सांगितले आहे. धरणाची क्षमता २५.३९ टीएमसी असून, आतापर्यंत १९.९८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

एवढाच साठा नियंत्रित करण्यात येणार असल्याने धरणातून प्रतिसेकंद १ हजार घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्ह्यात पावसाचा जोर कमी असला तरी धरणक्षेत्रात पाऊस चांगला असल्याने पाणीपातळीत वाढ होत आहे. मागील वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी ३१५ मिलिमीटर पाऊस अधिक झाला आहे.

• धरणगळतीच्या पार्श्वभूमीवर यंदा पूर्ण क्षमतेने पाणीसाठा नाही

• धरणाच्या एकूण क्षमता २५.३९ टीएमसी

• सध्या धरणात १९.९८ टीएमसी साठा

• १ हजार घनफुटाने विसर्ग

सुरक्षेच्या दृष्टीने...

धरणसुरक्षा आणि गळतीच्या दृष्टीने पाणीपातळी स्थिर ठेवण्यासाठी पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. धरणाच्या सांडव्यावरील पाच वक्राकार दरवाजांतून दूधगंगा नदीपात्रात प्रतिसेकंद १ हजार घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

Web Title: Doodhaganga Dam: 'So much' percent water in Doodhaganga Dam this year; Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.