Join us

Earthquake: नागपूरात २.५ रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद-नॅशनल सेंटर फॉर सिसमॉलॉजी

By मुक्ता सरदेशमुख | Published: May 04, 2024 1:04 PM

या वर्षात भूकंपांचे प्रमाण वाढले असून महाराष्ट्रात या भागांना बसले हादरे

नागपूरात २.५ रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेच्या  भूकंपाची नोंद करण्यात आली असून शुक्रवारी दुपारी ३ वाजून ११ मिनिटांनी हा भूकंप झाला.

पाच किलोमिटरच्या अंतराच्या खोलीपर्यंत हा हादरा बसला. किरकोळ स्वरूपाचा हा भूकंप असून या भूकंपात कोणतेही नुकसान झाले नसल्याचे नॅशनल सेंटर फॉर सिसमॉलॉजीने सांगितले.

या वर्षात महाराष्ट्रात भूकंप वाढले

महाराष्ट्रात भूकंपाच्या धक्क्यांचे प्रमाण वाढले असून जानेवारी महिन्यात पालघर जिल्ह्यातील तलासरी, डहाणू तालुक्यात हादरे बसले होते. तसेच हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यातही मार्च महिन्यात ४.५ रिश्टरचा भूकंप झाला होता.वाचा सविस्तर- 

हिंगोली, नांदेडसह परभणीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण 

पालघरमधील तलासरी,डहाणू तालुक्यात भूकंपाचे हादरे, नागरिकांमध्ये घबराट

टॅग्स :भूकंपनागपूर