महाराष्ट्रातील हिंगोली, नांदेडसह परभणीत आज सकाळी ६ वाजून ९ मिनीटांनी पहिला तर दहा मिनिटांनी ६ वाजून १९ मिनिटांनी दुसरा भूकंपाचा तीव्र धक्का बसला.यात कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे सांगण्यात येत असून नॅशनल सेंटर फॉर सिसमॉलॉजीने हा भूकंप ४.५ रिश्टर एवढ्या तीव्रतेचा असल्याचे सांगितले.
हिंगोलीसह परभणी नांदेडमध्ये भूकंपाचे दोन वेळा धक्के बसले. काही जून्या घरांना तडे गेल्याचे सांगण्यात येत असून या भूकंपाची खोली १० किमी होती. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते.भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिक घराबाहेर पडत असून मोकळ्या जागी जमा झाले होते. दरम्यान प्रशासनाकडून नुकसानाची पहाणी करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी आढावा घेत आहेत.