पालघर जिल्ह्यातील तलासरी, डहाणू तालुक्यात पुन्हा भूकंपाचे हादरे बुधवारी दुपारी १.४७ च्या सुमारास जाणवले. ३.४ रिश्टर एवढ्या तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपाचे हे धक्के फारसे तीव्र नसले तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.
पालघरचा तलासरी तालुक्यात २०१८ साली वारंवार भूकंपाचे धक्के बसले होते. या वर्षाच्या जानेवारीत पहिल्या आठवड्यात भूकंपाचे झटके येथे जाणवत आहेत. पालघरच्या तलासरी तालुक्यामध्ये 11 नोव्हेंबर 2018 पासून 3 रिश्टरपेक्षा 10हून अधिक धक्के बसले होते. त्या वेळी अनेक नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले. यासाठी प्रशासनाने अनेक उपाय योजना देखील केल्या होत्या. मार्गदर्शन शिबीर आयोजित केली होती. नवीन वर्ष सुरू होताच पुन्हा भूकंपांचे हादरे सुरू झाले असून नागरिकांमध्ये पुन्हा चिंतेचे वातावरण पसरले आहे. पंदलवाडी हे भूकंपाचे मुख्य प्रवण क्षेत्र असल्याने या परिसरातील अनेक जवळील गावांत काही घरांच्या भिंतींना हलक्याशा भेगा, तडा गेले आहेत.