भारताला तीव्र भुकंपाचा धोका कायम आहे, महाराष्ट्रात हातपंप व विहिरी कोरड्या झाल्याने दुष्काळ तीव्रता वाढते आहे. टॅक्टॉनिक प्लेटसच्या घर्षणातून बाहेर पडलेले बाष्प धुक्यात परिवर्तित होत आहे. तसेच थंडी बरोबर हुडहुडी पुन्हा तापमानात चढउतार हे बदल पहायला मिळणार आहेत. थंडी, धुके, भुजल साठा घटत दुष्काळाची तीव्रता वाढणे आणि आगामी काळात तीव्र भूकंपाची शक्यता यांचा परस्परांशी संबंध निर्माण झाला असून यावर अधिक गांभिर्याने जनहितासाठी संशोधन करीत सतर्क राहणे आवश्यक आहे.
अन्न सुरक्षा व राष्ट्रीय अर्थव्यवस्था मजबुतीसाठी शेती नियोजन गांभिर्याने घेत कृतीशील उपाययोजना आवश्यक व अपरिहार्य आहेत. थोडक्यात 'भुकंप, दुष्काळ, धुके आणि हुडहुडी' धोका कायम आहे व सुमारे १०० दिवसाचा काउंटडाऊन सुरू झाला आहे असे शास्त्रीय विश्लेषण याआधी किमान वीसपेक्षा जास्त वेळा मी आपल्याकडील 'सिक्रेट इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या मदतीने केले आहे. त्यातून भूकंपाची आगाऊ सूचना देऊन संभाव्य हानीपासून नागरिकांचे प्राण वाचविणे हा हेतू आहे.
असे आहे थंडी व धुक्याचा मागचे शास्त्रीय कारण?
नोव्हेंबरमध्ये, महाराष्ट्र आणि भारताच्या इतर भागांमध्ये हिवाळ्याच्या हंगामामुळे थंड तापमानाचा अनुभव येतो. कारण पृथ्वीचा आस हा साडे तेवीस अंश कललेला आहे. या भौगोलिक कारणाने नोव्हेंबरमध्ये, भारतासह उत्तर गोलार्ध सूर्यापासून दूर झुकलेला असतो परिणामी थेट सूर्यप्रकाश कमी पोहोचतो तसेच रात्र मोठी व दिवस लहान असल्याने तापमानात देखील सायंकाळी घसरण होते व थंडीने हुडहुडी भरते. विशेष म्हणजे धुक्याचे ढगांत रूपांतर होत पुन्हा थंडी कमी होणे आणि ढग विरल्यानंतर पुन्हा थंडीने हुडहुडी असे चक्र महाराष्ट्र व भारतातील विविध राज्यांत यावेळी असणार आहे. यंदा थंडीचा कालावधी हा कमी असेल आणि साधारणतः २०२४ च्या फेब्रुवारी व मार्चपासून पुन्हा पाऊस व एक्सटेंडेड मान्सून आणि २०२४ मध्ये 'सौर परिस्थिती'मुळे दुष्काळाला सामोरे जावे लागेल.
महाराष्ट्रातील वातावरणात आर्द्रतेत वेगवान बदल होत आहेत. सध्या आर्द्रतेत घट झाल्याने बोचरी थंडी जास्त जाणवेल, तसेच सकाळ सायंकाळ हुडहुडी जाणवेल. महाराष्ट्रात तापमानात घट, धुके तसेच विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण राहू शकेल.
का वाढली आहे दुष्काळाची तीव्रता?
महाराष्ट्रात हातपंप व विहिरी कोरड्या झाल्याने दुष्काळ तीव्र बनला आहे. कारण टॅक्टॉनिक प्लेटसच्या गतिशीलतेने पाणी भेगातून अधिक खोलवर झिरपून भूमिगत जलप्रवाहाची दिशा बदलली आहे. पुढील किमान १०० दिवस हिमालयाच्या रांगेत व पायथ्याशी जम्मू काश्मीर, लेह लडाख, उत्तराखंड, दिल्ली, उत्तर भारत, नेपाळ, भूतान, पाकिस्तान, अफगाणिस्तान, दक्षिण चीन तसेच ईशान्येकडील सात राज्यासह भारताला तीव्र व प्राणघातक भुकंपाचा धोका कायम आहे. तसेच महाराष्ट्राला देखील भुकंपाचा धोका कायम आहे.
भूकंप धोक्याचा प्रदेश!
कोयना परिसर तसेच उत्तर व मध्य महाराष्ट्र व गुजरातची राज्यसीमारेषा, कच्छचा प्रदेश येथे मोठ्या भुकंपाची धोका कायम असून आपत्ती व्यवस्थापन दलाने तसेच भारतीय जनतेने न घाबरता येत्या काळातील भूकंपाचा मुकाबला धैर्याने करण्यासाठी सतर्क राहणे आवश्यक आहे.
- प्रा. किरणकुमार जोहरे
आंतरराष्ट्रीय हवामान संशोधक
9168981939, 9970368009
kirankumarjohare2022@gmail.com