Join us

अरबी समुद्रात भूकंपाचे धक्के! ४.१ रिश्टरची तीव्रता

By मुक्ता सरदेशमुख | Published: January 06, 2024 11:34 AM

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिली माहिती

अरबी समुद्रात काल रात्री ९.५२ मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिली. ४.१ रिश्टर एवढी या भुकंपाची तीव्रता असल्याचे सांगण्यात आले. समुद्रात झालेल्या भूकंपाची तीव्रता गुजरात आणि महाराष्ट्राला संलग्न भागात झाल्याचे सांगण्यात येत आहे. नाशिकपासून हे अंतर १६३ किमी असून पुण्यापासून २५० किमी असल्याचे नोंदवण्यात आले.

नुकतेच पालघर जिल्ह्याच्या तलासरी, डहाणू तालुक्यात बुधवारी भूकंपाचे हादरे बसल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. बुधवारी दुपारी १.४७ च्या सुमारास ३.४ रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला होता.

संबंधित वृत्त- पालघरमधील तलासरी,डहाणू तालुक्यात भूकंपाचे हादरे, नागरिकांमध्ये घबराट

जगभरात वेगवेगळया भागात भूकंप, त्सूनामी, चक्रीवादळे, अवकाळी पाऊस, गारपीट, दुष्काळ अशा घटना वारंवार घडत आहेत. जपानमध्ये नुकतेच त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता. ७.६ रिश्टर एवढ्या तीव्रतेचे हादरे बसले होते. समुद्राच्या तळाशी होणाऱ्या अस्थीर हलचालींना वेग आला आहे. हवेतील आर्दता वाढल्याने भूकंपाचे ढग तयार होत असल्याचे तज्ञ सांगत आहेत. जीवघेण्या नैसर्गिक बदलांमुळे निसर्गाचं रौद्ररूपाचा सामना जग करत आहे.

संबंधित वृत्त- जपानमध्ये ७.६ रिश्टर स्केलचा भूकंप, भारतावर काय होणार परिणाम?

आज असाममध्ये ३.१ रिश्टरचा भूकंप

आज पहाटे (दि ६) आसाममधील मोरीगावमध्ये ३.१ रिश्टर एवढ्या तीव्रतेचा भूकंप झाल्याचे नोंदवण्यात आले. मागील चार दिवसात अफगाणिस्तान, पाकिस्तानातही भूकंपाचे हादरे बसल्याचे अर्थ सायन्स मंत्रालयाच्या अंतर्गत असणाऱ्या नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने नोंदवले.

टॅग्स :भूकंपहवामानदुष्काळजपानपालघर