Join us

कोकण व विदर्भ वगळता पुढील ५ दिवसात राज्यभर पावसाचा जोर ओसरणार

By मुक्ता सरदेशमुख | Published: September 18, 2023 7:12 PM

पुढील पाच दिवसात कोकण व विदर्भ वगळता राज्यभर पावसाचा जोर विसरणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.बंगालचा ...

पुढील पाच दिवसात कोकण व विदर्भ वगळता राज्यभर पावसाचा जोर विसरणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

बंगालचा उपसागरात ईशान्य दिशेस समुद्रसपाटीपासून 5.8 किलोमीटरवर चक्राकार वारे सक्रिय आहेत. परिणामी कोकणपट्ट्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आज व उद्या राज्यातील पावसाचा जोर ओसरला असला तरी बुधवारपासून विदर्भात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. आज कोकणातील रायगड , ठाणे जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून पुण्यातही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, आज कोकण व गोव्याच्या किनारपट्टी परिसरात बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. तसेच मध्य महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात व आजूबाजूच्या परिसरात तसेच विदर्भातही काही ठिकाणी पाऊस झाला. उर्वरित राज्यात तापमानात काहीशी वाढ झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले. 

आज पावसाची शक्यता कुठे?

आज (18 सप्टेंबर) राज्यात उत्तर कोकण व उत्तर मध्य महाराष्ट्रात ढगांच्या गडगडात सह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान रायगड, ठाणे व पुणे जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

अरबी समुद्राच्या दक्षिण मध्य भागात वाऱ्याचा वेग 45 ते 55 किमी प्रतितास राहणार असून अरबी समुद्राच्या ईशान्य भागात व गुजरात किनारपट्टी भागात जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

टॅग्स :पाऊसहवामानमोसमी पाऊसमोसमी पावसाचा अंदाज