Lokmat Agro >हवामान > उपसा जलसिंचन योजनांमधील ग्राहकांना वीज दर सलवत योजनेस मुदतवाढ

उपसा जलसिंचन योजनांमधील ग्राहकांना वीज दर सलवत योजनेस मुदतवाढ

Extension of Electricity Tariff Subsidy Scheme for customers in Upsa Jal Sanchan Schemes | उपसा जलसिंचन योजनांमधील ग्राहकांना वीज दर सलवत योजनेस मुदतवाढ

उपसा जलसिंचन योजनांमधील ग्राहकांना वीज दर सलवत योजनेस मुदतवाढ

सोमवारी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी काय महत्वाचा निर्णय..

सोमवारी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी काय महत्वाचा निर्णय..

शेअर :

Join us
Join usNext

अतिउच्चदाब, उच्चदाब व लघुदाब उपसा जलसिंचन योजनांमधील ग्राहकांना ३१ मार्च २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

अतिउच्चदाब व उच्चदाब ग्राहकांना 1.16 पैसे प्रति युनिट व स्थिर आकारामध्ये 25 रुपये प्रति केव्हीए इतकी सवलत मिळेल.  तर लघुदाब उपसा जलसिंचन ग्राहकांसाठी 1 रुपया प्रति युनिट व स्थिर आकारात 15 रुपये प्रति महिना अशी सवलत मिळेल.

७५ अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करणार

पुढील दोन वर्षात पूर्ण होऊ शकतील असे ७५ सिंचन प्रकल्प, तसेच पूर्ण झालेल्या १५५ प्रकल्पांचे कालवे व वितरण प्रणाली सुधारण्यासाठी एकत्रित १५ हजार कोटींपैकी पहिल्या टप्प्यात ७ हजार ५०० कोटींचे कर्ज नाबार्डकडून घेण्यास मंजुरी देण्याचा निर्णयही घेण्यात आला.

यापैकी ५ हजार कोटी रुपये अपूर्ण सिंचन प्रकल्पांपैकी पहिल्या टप्प्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणि २ हजार ५०० कोटी सिंचन प्रकल्पांपैकी प्रथम टप्प्यातील कालवे व वितरण प्रणाली सुधारण्यासाठी खर्च करण्यात येतील.

Web Title: Extension of Electricity Tariff Subsidy Scheme for customers in Upsa Jal Sanchan Schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.