Lokmat Agro >हवामान > जालना तालुक्यातील शेतकरी ठेवतोय पावसाच्या नोंदी, पेरणीसाठी फायदा

जालना तालुक्यातील शेतकरी ठेवतोय पावसाच्या नोंदी, पेरणीसाठी फायदा

Farmers of Jalna taluka are keeping rain records, benefits for sowing | जालना तालुक्यातील शेतकरी ठेवतोय पावसाच्या नोंदी, पेरणीसाठी फायदा

जालना तालुक्यातील शेतकरी ठेवतोय पावसाच्या नोंदी, पेरणीसाठी फायदा

शेतकऱ्यांनी पर्जन्यमानाची मोजणी सुरू केली आहे. यामुळे पावसाचे पाण्याचे नियोजन करणे सोपे झाले आहे.

शेतकऱ्यांनी पर्जन्यमानाची मोजणी सुरू केली आहे. यामुळे पावसाचे पाण्याचे नियोजन करणे सोपे झाले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

आपल्या भागात किती पाऊस पडला याचे मोजमाप तालुक्यातील शेतकरी ठेवत आहेत. खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राच्या मदतीने शेतकरी हा उपक्रम राबवितात. केंद्राकडून शेतकऱ्यांना पावसाची मोजणी कशी करावी याचे प्रशिक्षण देण्यात आले. शेतकऱ्यांनी पर्जन्यमानाची मोजणी सुरू केली आहे. यामुळे पावसाचे पाण्याचे नियोजन करणे सोपे झाले आहे.

पावसाचा अंदाज येतो
शेतकरी पावसाच्या नोंदी ठेवत असल्याने पाऊस किती पडला हे लगेच सांगता येते. तालुक्यात खणेपुरी, वानडगाव, सावरगाव, हडप, कचरेवाडी, खरपुडी, सारवाडी, रोहनवाडी, थेरगाव येथे शेतकऱ्यांनी स्वतः नोंदी घेतल्या आहेत.

खरपुरी येथील कृषी केंद्रामार्फत शेतकऱ्यांना पर्जन्यमानाचे मोजमाप कसे करायचे याचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणानंतर शेतकऱ्यांनी पावसाचे मापन सुरू केले आहे.  पावसाचे मोजणी होत असल्याने आपल्या भागात किती पाऊस पडला याचा अंदाज शेतकयांना येत आहे. पावसाचा अंदाज घेता येत असल्याने कोणत्या पिकाची लागवड करावी याचा अंदाज शेतकऱ्यांना येणार आहे.

प्रत्येकाने जलसाक्षर होणे गरजेचे
कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून कोणत्या गावात किती पाऊस झाला. याचा अभ्यास केला जातो. या उपक्रमामुळे विविध गावांमध्ये पडलेल्या पावसाच्या नोंदी घेणे शक्य झाले आहे. शेतकऱ्यांनी पावसाचे मोजमाप केल्यास पिकांच्या पेरणीसाठी हे उपयोगी ठरेल. गावातील शेतकऱ्यांनी पावसाच्या नोंदी पाठवल्या आहेत. प्रत्येक नागरिकाने जलसाक्षर होणे ही काळाची गरज आहे.
- प्रा. पंडित वासरे, कृषी अभियंता, कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी

Web Title: Farmers of Jalna taluka are keeping rain records, benefits for sowing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.