दरवर्षी सर्वाधिक तापदायक ठरणाऱ्या परतीच्या पावसाच्या तारखा दरवर्षी लांबत होत्या. यावर्षी मात्र परतीचा पाऊस नियोजित वेळेपूर्वी परतला आहे. १३ वर्षांचे रेकॉर्ड मोडले आहेत. १० ऑक्टोबरला महाराष्ट्रातून पाऊस परतल्याची घोषणा हवामान विभागाने केली. विदर्भ आणि कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रातून झाली आहे. विदर्भातूनही ही घोषणा होण्याची शक्यता आहे. यामुळे सोयाबीन उत्पादकांना काढणीच्या हंगामात दिलासा मिळणार आहे. मात्र, कापूस उत्पादकांना ऑक्टोबरच्या तडाख्याचा सामना करावा लागणार आहे.
मान्सूनचा पाऊस ज्याप्रमाणे सुखकारक असतो, त्यापेक्षाही भयावह रूप घेऊन परतीचा पाऊस राज्यभरात बरसत असतो. दरवर्षी एक दिवस पुढे यानुसार परतीचा पाऊस विलंबाने परतत पाऊस होता. यामुळे अल्पावधीत हाती येणाऱ्या परतल्याची घोषणा हवामान विभागाने पिकांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा महाराष्ट्रातून पाऊस परतल्याची घोषणा मराठवाड्यातील लागला. गत १३ वर्षामध्ये ११ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत परतीचा पाऊस परतला आहे. यामुळे काढणीला आलेल्या सोयाबीनची माती झाली. शेतकरी कर्जबाजारी झाले, याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला.
यावर्षी प्रथमच परतीचा पाऊस नियोजित तारखेपूर्वी परतला. यामुळे गत काही दिवसांपूर्वी उत्तर भारतातून पाऊस परतल्याची घोषणा झाली होती. ही घोषणा १० ऑक्टोबरला हवामान विभागाने केली आहे. सलग पाच दिवसांपासून पाऊस २०१५ मध्ये १५ ऑक्टोबर नसल्यामुळे आणि जमिनीतील आर्द्रता २०१६ मध्ये १८ ऑक्टोबर २०२३ मध्ये १० ऑक्टोबर कमी झाल्यामुळे हवामान विभागाने केली आहे. यामुळे सोयाबीन काढणीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळणार आहे. याशिवाय थंडीची चाहूल संकटात जाणवण्यासही सुरुवात होणार आहे.
अशा आहेत परतीच्या पावसाच्या तारखा
२०१० मध्ये ११ ऑक्टोबर २०१७ मध्ये २९ ऑक्टोबर२०११ मध्ये १३ ऑक्टोबर २०१८ मध्ये २९ ऑक्टोबर२०१२ मध्ये १५ ऑक्टोबर २०१९ मध्ये १८ ऑक्टोबर२०१३ मध्ये १९ ऑक्टोबर २०२० मध्ये १९ ऑक्टोबर२०१४ मध्ये १४ ऑक्टोबर २०२१ मध्ये २० ऑक्टोबर२०१५ मध्ये १५ ऑक्टोबर २०२२ मध्ये १५ ऑक्टोबर२०१६ मध्ये १८ ऑक्टोबर २०२३ मध्ये १० ऑक्टोबर
परतीच्या पावसाने शेतकयांची पिळवणूक
गत काही वर्षांत काढणीला आलेल्या पिकांच्या वेळेतच परतीचा पाऊस धुमाकूळ घालत असल्याने शेतकरी मजुरांनी मागणी केली. त्यानुसार मजुरीचे दर देण्यास सुरुवात केली होती. पिकांच्या संरक्षणासाठी ताडपत्र्या, मेणकापडाची अतिरिक्त खरेदी करावी लागली. यातून शेतकरी चांगलाच पिचला गेला. गत १३ वर्षांत शेतकऱ्यांना अवास्तव दरवाढीसह नुकसानीचा दुहेरी सामना करावा लागला.
मराठवाड्यातील रब्बी हंगाम संकटात
मान्सूनचा पाऊस अपूरा बरसल्याने पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडयात परतीच्या पावसावर आशा होती. मात्र, हा पाऊस बरसला नाही. यामुळे रबी हंगाम होणार रबी हंगाम कसा, हा प्रश्न या भागातील शेतकन्यांपुढे उभा झाला आहे. विदर्भ आणि कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रातून पाऊस परतल्याची घोषणा हवामान विभागाने केली आहे. येत्या दोन दिवसांत विदर्भातूनही ही घोषणा होण्याची शक्यता आहे.