राज्यात तापमानात वारंवार चढ उतार होत असल्याचे दिसून येत आहे. ऐन थंडीच्या सुरूवातील अवकाळी पडून गेल्याने आता कोरडे हवामान असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, तीन चार दिवसांनी कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात तूरळक ठिकाणी हलक्या व मध्यम सरींचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागान वर्तवला आहे.
दरम्यान, राज्यातील किमान व कमाल तापमानात वाढ झाल्याचे आज चित्र होते.आज मुंबईत किमान तापमान ३३.९ अंश सेल्सियसपर्यंत गेले असल्याचे आजचा हवामान अहवाल सांगतो. मराठवाडा, विदर्भ खान्देशात किमान तापमानातही काहीशी वाढ दिसून येत आहे.
राज्यात आज बीड जिल्ह्यात सर्वात कमी किमान तापमान १६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तर कोकणातील दापोली जिल्ह्यातील हरनाई येथे किमान तापमान सर्वाधिक २७.२ अंश नोंदवले गेले. मुंबई- कुलाबा, सांताक्रूज भागात २४.४ व २५.५ अंश तापमानाची नोंद झाली.
मराठवाड्यात पुढील पाच दिवस वातावरण कोरडे राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मागील दोन ते तीन दिवस तापमानात फारशी तफावत जाणवत नव्हती. आता किमान व कमाल तापमानात हळूहळू १ ते २ अंशानी घट होत आहे.उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम असला तरी मध्य महाराष्ट्र,विदर्भ मराठवाड्याला थंडीची प्रतिक्षा आहे.
सध्या पूर्वीय वाऱ्यांची स्थिती नैऋत्य व बंगालच्या उपसागराला जोडून श्रीलंकेच्या समुद्रावर असल्याने चक्राकार वाऱ्यांची स्थिती दक्षीणेतील राज्यांमध्ये अधिक असल्याने केरळ, आंध्र प्रदेश या भागात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रावर या वाऱ्यांचा सध्यातरी कोणताही परिणाम नसल्याने कोरड्या हवामानाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये किमान तापमान सरासरी तापमानाच्या खाली होते. विदर्भात आज सरासरी तापमानाची नोंद झाली.
आज कोणत्या कसे होते तापमान?
शहर | कमाल तापमान | किमान तापमान |
अहमदनगर | - | १७.५ |
औरंगाबाद | ३१.६ | १८.६ |
बीड | ३२.० | १६.०० |
डहाणू | ३४ | ३२.० |
हरनाई | ३३.० | २२.४ |
जळगाव | ३२.७ | २७.२ |
कोल्हापूर | ३१.५ | १६.५ |
मुंबई कुलाबा | ३१.८ | २०.६ |
मुंबई सांताक्रूज | ३३.९ | २५.५ |
नांदेड | ३२.६ | २४.४ |
नाशिक | ३१.९ | १९.० |
सातारा | ३२.० | २१.० |
पावसाची शक्यता नेमकी कधी?
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात २३ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर रोजी तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.राज्यात ऐन थंडीत पुन्हा हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे. पावासाचा प्रभाव फार नसला तरी तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी असेल.
दरम्यान, प्रादेशिक हवामान केंद्राच्या विस्तारित अंदाजानुसार दिनांक 24 ते 30 नोव्हेंबर दरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित जास्त राहण्याची शक्यता आहे.