सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून भीमा नदीत १० मेपासून पाणी सोडण्यात येणार असून यामुळे उजनी धरणाचीपाणी पातळी यावर्षी इतिहासात प्रथमच कमालीची घटणार असून वजा ६० टक्क्यांपेक्षा जास्त खाली जाण्याचा अंदाज उजनी धरण व्यवस्थापक अभियंता प्रशांत माने यांनी दिली.
गतवर्षी ६ मे रोजी पाणी पातळी मृतसाठ्यात गेली होती. सोलापूर शहराला १५ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा भीमा नदीवरील चिंचपूर व टाकळी बंधाऱ्यात शिल्लक आहे. यासाठी महानगरपालिकेने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे उजनीतून पाणी सोडण्याची मागणी केली होती.
त्यानुसार कुमार आशीर्वाद यांनी १० मे रोजी जलसंपदा विभागाला पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार दि. १० मे रोजी उजनी धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
५ हजार क्युसेक विसर्गाने गाळ मोरीतून पाणी सोडण्यात येणार असून यासाठी ५ ते ६ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. सध्या उजनी धरणाची पाणी पातळी वजा ४४.२१ टक्के असून उजनीतून भीमा नदीत सोडल्यास वजा ५८ टक्क्यांपर्यंत पाणी पातळी घटण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या उजनी धरणात ३९.९८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. २० मेनंतर ३४ टीएमसी पाणी शिल्लक राहण्याचा अंदाज आहे. यानंतर आषाढी वारीसाठी उजनीतून पाणी सोडले जाऊ शकते. गतवर्षी ६ मे रोजी ६३.६६ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता.
१५ टीएमसी पाण्याचे बाष्पीभवनसोलापूर शहरासाठी उजनी धरणातून ३ पाळ्यातून पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात येते. यासाठी १८ ते २० टीएमसी पाणी सोडले जाते. खरीप व रबी हंगामात १४ ते १५ टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होते. उन्हाळ्यात बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो. उजनी धरणात अंदाजे १४ टीएमसीपर्यंत गाळ आहे. मृत साठ्यात आठ टीएमसी तर मृत साठ्यात ६ टीएमसीपर्यंत गाळ धरण्यात येतो.
उजनी अप टू डेट• १५ ऑक्टोबर ६०.६६ टक्के• १० नोव्हेंबर ५०.३५ टक्के• २१ जानेवारी ०.०० मृत साठ्यात• ८ मे वजा ४४.२१ टक्के