Join us

येते चार दिवस धो-धो पावसाचे, भारतीय हवामान विभागाचा राज्यात मुसळधार पावसाचा इशारा  

By मुक्ता सरदेशमुख | Published: July 20, 2023 8:56 PM

उत्तर-पश्चिम बंगालची खाडी आणि ओडीशा किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्यात पाऊस

भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्राला येते चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.  मागील दोन दिवसांपासून राज्यात विविध जिल्ह्यात जोरदार पावसामुळे दाणादाण उडाली. पुढील २४ तासात पालघर, रायगड, ठाणे, सातारा आणि पुण्यात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.

उत्तर पश्चिम बंगालची खाडी आणि ओडीशा किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्यात पाऊस पडत असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. आज नाशिक, लातूर, नांदेड,परभणी, हिंगोली, यवतमाळ अमरावती, नागपूर , वर्धा अकोला, बुलढाणा, वाशीम जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर २२ ते २४ जुलै दरम्यान राज्यात अतिवृष्टीची  शक्यता आहे. 

मेघगर्जनेसह  मुसळधार  पाऊस 

मराठवाड्यातही पुढील तीन दिवस मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. नांदेड, लातूर, धाराशिव, परभणी हिंगोली येथे वादळी वाऱ्यासह मुसळधारांची शक्यता वर्तवण्यात आली असून वाऱ्याचा वेग तशी ३० ते ४० किमी असणार आहे. दरम्यान,  आयएमडी पुणे विभागाचे हवामान शास्त्रज्ञ के एस होसाळीकर यांनी ट्विट करून हवामान विभागाचा पावसाचा अंदाज वर्तवला. 

https://twitter.com/Hosalikar_KS/status/1682018215847948288

"20 Jul, coming 4 days heavy rainfall alerts by IMD in Maharashtra pl. येत्या 4 दिवसात IMD कडून महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा. "असे ट्विट त्यांनी केले आहे. 

टॅग्स :मोसमी पावसाचा अंदाजपाऊसमहाराष्ट्रमोसमी पाऊसशेती क्षेत्र