नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील गिरणा डॅम धरणाने यावर्षी तेराव्यांदा शंभरी पार केली असल्याने गिरणा धरणाच्या जलसाठ्यातून सद्यःस्थितीत एक दरवाजा २० सेमीने उघडण्यात आलेला दरवाजा दि. ९ डिसेंबर सोमवारपासून पूर्णपणे बंद करण्यात आला असून, गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेला गिरणा डॅमचा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
दि. २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी गिरणा धरणातून ८२५ क्युसेक विसर्ग गिरणा नदी पात्रात सोडण्यात आला होता. सद्यःस्थितीत गिरणा धरणातून ८२५ क्युसेक पाण्याचा विसर्ग चालू होता. गिरणा नदी पात्राला पुराचे स्वरूप प्राप्त झाले होते. नदीकाठच्या व शेजारी गावकऱ्यांनी नदीत जाऊ नये. असा सतर्कतेचा इशारा दिला होता. गेल्या तीन महिन्यांपासून नांदगाव तालुक्यातील गिरणा डॅम धरणातून पाण्याचा विसर्ग चालू होता मात्र हा विसर्ग आता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
यापूर्वी १,२३८ क्युसेक विसर्ग सुरू होता. एक दरवाजा ३० सेमीने उघडण्यात आला होता. परंतु २५ नोव्हेंबर सोमवार रोजी सर्व वक्रद्वार दरवाजे पूर्णपणे बंद करण्यात आले होते. मात्र दि. २८ नोव्हेंबर गुरुवार ऐवजी सायंकाळी ६ वाजता पुन्हा गिरणा धरणाचा वक्रद्वार क्रमांक १ हा २० सेमीने उघडण्यात आला असून त्यातून ८२५ क्युसेक विसर्ग गिरणा नदीपात्रात सोडला जात होते. ते आता पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.
नांदगाव, मालेगाव या तालुक्यांसह निम्मा जळगाव जिल्ह्याची शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्याची तहान भागवणाऱ्या गिरणा धरणाने शंभरी पार केल्याने, ५२ हजार हेक्टर क्षेत्रावरील सिंचन व पिण्याच्या पाण्याचा बिकट प्रश्न सुटला आहे.
हेही वाचा : Sericulture Success Story : रेशीम शेतीने दिले नवे जीवन; शेतकरी म्हणतोय रेशीम दैवी वरदान