Lokmat Agro >हवामान > शेतकऱ्यांसाठी खुशखबर; नीरादेवघर व भाटघर धरणांतून १० मार्चला पाणी सोडणार

शेतकऱ्यांसाठी खुशखबर; नीरादेवघर व भाटघर धरणांतून १० मार्चला पाणी सोडणार

Good news for Farmers; Water will be released from Nira devghar and Bhatghar dams on March 10 | शेतकऱ्यांसाठी खुशखबर; नीरादेवघर व भाटघर धरणांतून १० मार्चला पाणी सोडणार

शेतकऱ्यांसाठी खुशखबर; नीरादेवघर व भाटघर धरणांतून १० मार्चला पाणी सोडणार

भोर तालुक्यातील निरादेवघर धरणात ३९ टक्के तर भाटघर धरणात ४८ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षीच्या तुलनेत अत्यंत कमी पाणीसाठा राहिला आहे. सध्या पाणी सोडणे बंद केले असले तरी १० मार्चनंतर पाणी सोडायला सुरुवात होणार आहे.

भोर तालुक्यातील निरादेवघर धरणात ३९ टक्के तर भाटघर धरणात ४८ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षीच्या तुलनेत अत्यंत कमी पाणीसाठा राहिला आहे. सध्या पाणी सोडणे बंद केले असले तरी १० मार्चनंतर पाणी सोडायला सुरुवात होणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

भोर तालुक्यातील निरादेवघर धरणात ३९ टक्के तर भाटघर धरणात ४८ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षीच्या तुलनेत अत्यंत कमी पाणीसाठा राहिला आहे. सध्या पाणी सोडणे बंद केले असले तरी १० मार्चनंतर पाणी सोडायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे राहिलेला पाणीसाठा अत्यंत कमी होणार आहे. टंचाईची समस्या उद्भवण्याची शक्यता आहे.

११.९१ टीएमसी असलेले निरादेवघर धरण व २४ टीएमसी असलेले भाटघर ही दोन्ही धरणे १०० टक्के भरली होती. मात्र धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे मागील वर्षी निरादेवघर धरणात ७० टक्के तर भाटघर धरणात ५८ टक्के पाणीसाठा होता.

म्हणजे निरादेवघर धरणात ३१ टक्के तर भाटघर धरणात १० टक्के पाणीसाठा कमी आहे. भोर तालुक्यातील भाटघर आणि निरादेवघर धरणातील पाण्याचा वीर धरणातून उजव्या आणि डाव्या कालव्यातून पाणी शेती आणि पिण्यासाठी भोर, पुरंदर, बारामती, इंदापूर, फलटण, माळशिरस, पंढरपूर, सांगोला तालुक्यांना होतो. मागील वर्षीच्या तुलनेत दोन्ही धरणात पाणीसाठा झाला आहे.

सध्या धरणातील पाणी निरा नदीत सोडणे बंद असले तरी पुढील १० मार्चनंतर पाणी सोडायला पुन्हा सुरुवात होणार आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा अजून कमी होणार आहे. यामुळे भोर तालुक्यात उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते.

भोर तालुक्यात भाटघर २४ तर निरादेवघर १२ असे एकूण ३६ टीएमसी आणि वेल्हे तालुक्यात ४ टीएमसी असा ४० टीएमसी पाणीसाठा होतो. मात्र, दर पावसाळ्यात धरणे भरतात आणि उन्हाळ्यात पुन्हा रिकामी होतात.

निरादेवघर आणि भाटघर धरण भागात उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी वस्था भोर वेल्हे तालुक्याची आहे, याकडे पाटबंधारे विभागाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

Web Title: Good news for Farmers; Water will be released from Nira devghar and Bhatghar dams on March 10

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.