राज्यात अवकाळी पाऊस, वाढते तापमान, गारपीटीचे सत्र अजून सुरुच असून दि ६ ते ९ एप्रिल दरम्यान मराठवाडा व विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्रात एकीकडे उष्णतेच्या लाटांचा इशारा देण्यात आला असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भासह मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे.
सध्या कर्नाटक, तमिळनाडू पासून विदर्भापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. परिणमी राज्यात पुन्हा एकदा पावसाला पोषक वातावरण तयार झाले असून ढगाळ वातावरणासह उन्हाच्या झळा कायम असून उकाडा असह्य झाला आहे.
आज दि ६ रोजी अमरावती व यवतमाळ जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून नांदेडमध्ये रात्र उष्ण असेल असे सांगण्यात आले आहे. तर उद्यापासून राज्यात पावसासह गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भात धुळे, नंदूरबार, जळगाव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर,वर्धा या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आणि तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता आहे. दरम्यान वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून गारपीट होण्याचीही शक्यता संभवते.
मराठवाड्यात धाराशिव, लातूर, नांदेड,बीड, छत्रपती संभाजीनगर तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यांनाही पावसासह गारपीटीचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील ३ दिवस राज्यात पावसासह गारपीटीची शक्यता देण्यात आली असून हवामान विभागाने यलो, ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
दिनाक ८ व ९ तारखेला कुठे अलर्ट?
यलो अलर्ट- जळगाव,अहमदनगर, सोलापूर,छत्रपती संभाजीनगर, जालना,परभणी,बीड,हिंगोली,नांदेड,लातूर,धाराशिव,अकोला,भंडारा,बुलढाणा,गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वाशिम,यवतमाळ
ऑरेंज अलर्ट- वर्धा, चंद्रपूर, अमरावती
दि ९ एप्रिल
यलो अलर्ट- अहमदनगर,पुणे,सांगली,सोलापूर,छत्रपती संभाजीनगर,जालना,बीड,लातूर,धाराशिव,अकोला,अमरावती,भंडारा,बुलढाणा,नागपूर