Lokmat Agro >हवामान > Global Warming हवामान विभाग प्रमुख सांगतायत तापमान वाढीचा इतिहास

Global Warming हवामान विभाग प्रमुख सांगतायत तापमान वाढीचा इतिहास

Head of Meteorological Department tells the history of temperature rise | Global Warming हवामान विभाग प्रमुख सांगतायत तापमान वाढीचा इतिहास

Global Warming हवामान विभाग प्रमुख सांगतायत तापमान वाढीचा इतिहास

मार्च, एप्रिल आणि मे हे उन्हाळ्याचे महिने असतात. आता मात्र ऋतू राहिलेला नसून आहे. गेल्या काही दशकांत प्रत्येक वर्ष सर्वाधिक उष्ण नोंदविले जात आहे. प्रत्येक वर्षी मागचा विक्रम मोडला जात आहे.

मार्च, एप्रिल आणि मे हे उन्हाळ्याचे महिने असतात. आता मात्र ऋतू राहिलेला नसून आहे. गेल्या काही दशकांत प्रत्येक वर्ष सर्वाधिक उष्ण नोंदविले जात आहे. प्रत्येक वर्षी मागचा विक्रम मोडला जात आहे.

शेअर :

Join us
Join usNext

मार्च, एप्रिल आणि मे हे उन्हाळ्याचे महिने असतात. आता मात्र ऋतू राहिलेला नसून आहे. गेल्या काही दशकांत प्रत्येक वर्ष सर्वाधिक उष्ण नोंदविले जात आहे. प्रत्येक वर्षी मागचा विक्रम मोडला जात आहे. जागतिक हवामान संघटनेनेही घोषित केले होते की, एप्रिल महिना सर्वाधिक उष्ण होता.

१९०१ पासूनची माहिती कसे परिवर्तन झाले? ते यातून दिसून येते आहे. १९७० ते ८० पासून सरासरी तापमानात वाढ झाली. त्यानंतर सरासरी तापमान कधीही कमी ते चाळीस वर्षांत तापमान जास्त आहे.

उन्हाळा केवळ त्याची तीव्रता वाढत हवामान विभागाकडे आहे. देशभरात झालेले नाही. तीस सरासरीपेक्षा आयपीसीसी या जागतिक संघटनेच्या अहवालात तापमान वाढ ही अनैसर्गिक असल्याचे नमूद केले आहे. मानवी हस्तक्षेप वाढल्याने तापमान वाढ होत आहे.

पृथ्वीवरील उष्णता अवकाशात न जाता पुन्हा पृथ्वीवर येत आहे. इंधनाच्या अतिवापरामुळे कार्बन उत्सर्जन मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. वाहनेच नव्हे तर मोठ्या उद्योगांत इंधनाच्या वापराचा अतिरेक झाला आहे. बांधकामे वाढत आहेत, झाडे कमी होत आहेत. जंगलतोड, काँक्रिटीकरण होत आहे. त्यामुळे अर्बन हीट आयलँड तयार होत आहे.

उष्णता वाढली तर काय होते?
उष्णता वाढते, तेव्हा हवेतील आर्दता शोषून घेण्याची क्षमता वाढते. अधिक आर्दता शोषून घेतल्याने मोठे ढग तयार होतात. त्यामुळे कमी वेळेत अधिक पाऊस पडतो. कृषी आणि आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम होत असतो. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना, बाहेर दिवसा काम करणाऱ्यांना त्याचा मोठा फटका बसतो. त्यांचे आरोग्य धोक्यात येते. कृषी, जलसाठा, उद्योग- धंद्यांसह वीज क्षेत्रावर परिणाम होतो. उष्णता वाढली की, विजेची मागणी वाढते.

हवामान आणि चिडचिडेपणा
हवामान चांगले नसेल तर स्वभाव चिडचिडा होतो. आता तर दिवसा आणि रात्रीचे तापमानही अधिक नोंदविले जात असून, रात्रही उष्ण होत आहे. मुंबईसारख्या शहरात तापमान आणि आर्द्रतेचा फटका अधिक बसतो. शहर, जिल्हा, तालुका प्रत्येक टप्प्यावर आपण हवामानाचा अंदाज देत आहोत.

तापमान वाढ चिंतेचा विषय
सरासरीच्या तुलनेत अधिक तापमान नोंदविले तर आपण उष्णतेच्या लाटेचा इशारा देत आहोत. पूर्वीच्या आणि आताच्या उष्णतेच्या लाटांत खूप फरक आहे. आता उष्णतेच्या लाटांची तीव्रता वाढली आहे. त्याची व्याप्ती वाढली आहे.

आता केवळ नागपूर किंवा मराठवाड्यात उष्णतेची लाट येत नाही तर कोकणातही उष्णतेच्या लाट धडकत आहेत. यावर उपाय म्हणजे झाडे लावणे आणि कार्बन उत्सर्जन कमी करणे. विजेवरील वाहनांचा वापर वाढविणे, असे अनेक उपाय आहेत. जनजागृती केली पाहिजे. जागतिक तापमान वाढ किंवा वाढती उष्णता हा केवळ तुमचा, माझा विषय राहिलेला नाही तर सर्वांचाच विषय झाला आहे.

- डॉ. कृष्णानंद होसाळीकर
प्रमुख, हवामान विभाग, पुणे

अधिक वाचा: कर्नाटकने भीमा नदीवर बांधलेल्या या बंधाऱ्याने महाराष्ट्राच्या शेतीला मिळणार लाभ

Web Title: Head of Meteorological Department tells the history of temperature rise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.