Join us

Heat Wave देशात ११ राज्यांमध्ये उष्णतेची लाट कायम, मान्सूनची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 11:49 AM

देशात पावसाळा सुरू झाला असला तरी ११ राज्यांमध्ये उष्णतेची लाट कायम आहे. हवामान खात्याने उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल, हरयाणा, चंडीगड, दिल्ली, पंजाब, मध्य प्रदेश, ओडिशा, झारखंड, बिहार आणि जम्मू विभागातील काही भागांसाठी अलर्ट जारी केला आहे.

नवी दिल्ली : देशात पावसाळा सुरू झाला असला तरी ११ राज्यांमध्ये उष्णतेची लाट कायम आहे. हवामान खात्याने उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल, हरयाणा, चंडीगड, दिल्ली, पंजाब, मध्य प्रदेश, ओडिशा, झारखंड, बिहार आणि जम्मू विभागातील काही भागांसाठी अलर्ट जारी केला आहे.

सध्या दिल्लीत कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. गेल्या ४८ तासांत उष्माघाताने ७ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ५ रुग्ण राममनोहर लोहिया (आरएमएल) रुग्णालयात उपचार घेत होते, तर २ रुग्ण सफदरजंग रुग्णालयात दाखल होते.

आरएमएल रुग्णालयात सध्या १२ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. उष्णतेची लाट सुरू झाल्यापासून आतापर्यंत ४५ जणांना उष्णतेच्या आजारामुळे येथे दाखल करण्यात आले आहे. गाझियाबाद, नोएडा आणि दिल्लीमध्ये गेल्या ३ दिवसांत उष्णतेच्या लाटेमुळे ४२ लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, प्रशासनाने याला दुजोरा दिलेला नाही.

मान्सून ४ दिवसांत ७ राज्यांमध्ये पोहोचणारदेशातील अर्ध्याहून अधिक राज्यांमध्ये मान्सून पोहोचला आहे. ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे आणि इतर राज्यांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे.

दिल्लीत रात्रीचे तापमान विक्रमी पातळीवरराजधानी दिल्लीत १२ वर्षांनंतर रात्रीचे किमान तापमान विक्रमी ३५.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. २०१२ मध्ये ३४ अंश तापमानाची नोंद झाली होती. राजधानीत उष्णतेमुळे विजेची मागणी विक्रमी ८,६४७ मेगावॅटवर पोहोचली आहे.

टॅग्स :हवामानतापमानदिल्लीउष्माघातमोसमी पाऊस