Join us

Heat Wave Maharashtra:हवामान विभागाने दिला उष्णतेच्या लाटांचा इशारा, पुढील दोन महिन्यात..

By मुक्ता सरदेशमुख | Published: April 02, 2024 1:41 PM

हवामान विभागाने उष्णतेच्या लाटांचा इशारा देण्यात आला आहे. यंदा उन्हाळ्यात राज्यात तापमान चाळीसच्या पुढे जात असून येत्या दोन महिन्यात ...

हवामान विभागाने उष्णतेच्या लाटांचा इशारा देण्यात आला आहे. यंदा उन्हाळ्यात राज्यात तापमान चाळीसच्या पुढे जात असून येत्या दोन महिन्यात उष्णतेच्या लाटा येणार असल्याचे सांगण्यात आले. या वर्षाच्या एप्रिल ते जून महिन्यात तापमान सामान्य तापमानापेक्षा चढेच राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले. 

भारतीय हवामान विभाग आणि अर्थ सायन्स मंत्रालयाकडून सोमवारी येत्या दोन महिन्यांचा हवामान अंदाज जारी करण्यात आला. भारतात मध्य व पश्चिम द्विकल्पीय भागात तापमान सामान्य तापमानापेक्षा अधिक राहण्याची शक्यता असून देशाच्या मैदानी भागात उष्णतेच्या लाटेचे दिवस सामान्यापेक्षा जास्त असू शकतात. वेगवेगळ्या भागांमध्ये ४ ते ८ दिवसांऐवजी १० ते २० दिवस उष्णतेची लाट अपेक्षित आहे.

महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश,आणि उत्तर कर्नाटक यानंतर राजस्थान,मध्य प्रदेश आणि उत्तर छत्तीसगड ओडिशा आणि आंध्र प्रदेश हे उष्णतेच्या लाटेचा सर्वाधिक प्रवण क्षेत्र आहेत.पश्चिम हिमालयीन प्रदेश, ईशान्य राज्ये आणि उत्तर ओडिशाच्या काही भागात सामान्य ते सामान्य कमाल तापमान सामान्य ते सामान्य कमाल तापमानापेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच एल निनोची स्थिती निवळली असमन सध्या भूमध्य प्रशांत महासागर क्षेत्र मध्यम एल निनोचे क्षेत्र सक्रीय आहे.

टॅग्स :तापमानउष्माघातहवामान