Join us

राज्यातील 'या' शहरांना उष्णतेच्या लाटेचा इशारा; वाचा काय सांगताहेत हवामान तज्ञ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 13:34 IST

Summer Heat Wave Warning : दिनांक ९, १० आणि ११ मार्च रोजी उष्णतेची लाट येईल, अशी माहिती माजी हवामान अधिकारी कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.

मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात ९, १० आणि ११ मार्च रोजी उष्णतेची लाट येईल, अशी माहिती माजी हवामान अधिकारी कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.

मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटा, तर दक्षिण कोकणातील काही भागांत उष्णतेच्या लाटा येतील, असेही त्यांनी सांगितले.

मुंबईचे कमाल तापमान शुक्रवारी ३५.८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून, बुधवारपर्यंत यात आणखी वाढ होणार आहे. तर हवामान अभ्यासक अश्रेया शेट्टी यांनी सांगितले की, पूर्वेकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे तापमानात वाढ होत आहे.

१२ मार्चपर्यंत मुंबई महानगर प्रदेशात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. पालघर, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याणमध्ये ४० अंश तापमान नोंदविले जाईल. रविवार ते मंगळवारदरम्यान उन्हाचा तडाखा तीव्र असू शकतो.

उष्णतेची लाट म्हणजे?

कोकणात उष्णतेची लाट म्हणजे दिवसाचे कमाल तापमान ३७अंशांपेक्षा अधिक नोंदविले जाईल. ते त्या दिवसाच्या सरासरी तापमानापेक्षा ४ अंशांनी जास्त असेल.

कुठे किती पारा?

अलिबाग - ३६.६छ. संभाजीनगर - ३६.२बीड - ३६जळगाव - ३६.३कोल्हापूर - ३६.६मुंबई - ३५.८पालघर - ३६.३रत्नागिरी - ३७.३सांगली - ३७.२

हेही वाचा : बळीराजाने उदरनिर्वाहाचे साधन म्हणून नव्हे तर व्यवसाय म्हणून पहावे; वाचा आधुनिक शेती व्यवसायाचे फायदे

टॅग्स :हवामान अंदाजउष्माघातमहाराष्ट्रसमर स्पेशलतापमान