Join us

heat wave: हवामान विभागाने या भागांना दिला उष्णतेच्या लाटांचा यलो अलर्ट

By मुक्ता सरदेशमुख | Published: April 16, 2024 9:10 AM

किती वाढू शकते तापमान? काय काळजी घ्यावी? हवामान विभागाने सांगितले...

राज्यात एकीकडे अवकाळी पाऊस आणि गारपीटीने तांडव घातला असताना दुसरीकडे भारतीय हवामान विभागाने काही भागांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट दिला आहे.

ठाणे, रायगड जिल्ह्यांना हवामान विभागाने उष्णतेच्या लाटांचा इशारा दिला आहे. तर धाराशिवसह पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, लातूर, बीड व मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

येत्या ३ ते ४ दिवसात महाराष्ट्रात तापमान हळूहळू वाढणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. दरम्यान उत्तर कोकण भागात उष्णतेच्या लाटांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

उष्णतेच्या लाटांमध्ये तापमान चाळीसपार जाण्याची शक्यता असून उंचवट्याच्या प्रदेशांमध्ये ३० अंशांच्या पुढे तापमान जाऊ शकते. सामान्य कमाल तापमानाच्या ४.५ ते ६.४ अंश सेल्सिअस अधिक तापमान या काळात राहण्याची शक्यता असते.

उष्णतेच्या लाटांपासून कसे वाचाल?

  • हवामान विभागाने उष्णतेच्या लाटांचे तापमान सामान्यांना सोसवणारे असेल मात्र  वृद्ध, आजारी, लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने चिंताजनक असल्याचे सांगितले..
  • उन्हात बाहेर पडू नका.
  • बाहेर जाताना हलके, सुटसुटीत व फिकट रंगाचे कॉटनचे कपडे घालावेत.
  • बाहेर जाताना डोक्याला स्कार्फ, रुमाल बांधूनच बाहेर पडावे.
टॅग्स :उष्माघातपाऊसहवामानतापमान