राज्यात विविध भागात काल सकाळपासून अवकाळी पावसाची जोरधार दिसली. अवकाळी पावसाने कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार हजेरी लावली असून पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.
पुणे, नाशिक, नगर, धुळे नंदुरबारसह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस झाला.दरम्यान,कोकणात किमान तापमानाचा पारा वाढला होता. बहुतांश भागात पावसाला पोषक वातावरण तयार झाल्याने तापमान चढे होते.
महाराष्ट्रभर रिमझिम पाऊस! पिकांवर कसा होणार परिणाम?
छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पाऊस
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मंगळवारी संध्याकाळपासून पावसाच्या हलक्या सरींना सुरुवात झाली तर रात्री जोरदार पावसाने हजेरी लावली. आज सकाळपासून ढगाळ वातावरणासह हवेतील गारठा वाढल्याचे सांगण्यात येत आहे.
पुण्यात मुसळधार
पुण्यात काल दुपारपासून पावसाची रिमझिम सुरु होती.त्यानंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली. ढगाळ वातावरणासह किमान तापमान काल १८ ते २२ अंशांपर्यंत गेले होते.
पावसाळी वातावरण राहणार फक्त दोनच दिवस
कोकणातही जोरधारा
काल कोकणातील रामेश्वर,देवगड येथे ५२.४ मिमी पावसाची नोंद झाली.शिवाय सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कुडल येथे १८ मिमी तर दवगडमध्ये ५२.४ मिमी पाऊस झाला.
नाशिकमध्ये पुन्हा अवकाळी
नाशिक जिल्ह्यात सोमवारी पुन्हा एकदा अवकाळी पाऊस झाला. कांदा पिकासह द्राक्ष उत्पादक पिकांना फटका बसण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
परभणी, धारशिवसह या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता,येत्या ३-४ तासांत...
येत्या २४ तासांत कसे राहणार हवामान?
येत्या २४ तासांत राज्यात बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने वर्तवले. आज कोणत्याही जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला नसून कोकण, मध्य-उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.