Join us

चांदोली धरण क्षेत्रात दमदार पाऊस, धरणात आलं किती पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2024 3:32 PM

चांदोली धरण chandoli dharan पाणलोट क्षेत्रात पावसाने गेल्या नऊ दिवसांत दमदार हजेरी लावली आहे. चांदोली धरणात एकूण १४.५२ टीएमसी तर ७.६४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने गेल्या नऊ दिवसांत दमदार हजेरी लावली आहे. चांदोली धरणात एकूण १४.५२ टीएमसी तर ७.६४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. पाऊस सुरू झाल्यापासून पाणीसाठ्यात ४.२२ टीएमसीने वाढ झाली आहे.

आतापर्यंत दोन टीएमसी पाणी धरणातून नदीपात्रामध्ये सोडण्यात आले आहे. वारणा नदीची पाणीपातळी वाढल्याने कोकरूड-रेठरे बंधारा पाचव्या दिवशीही पाण्याखाली आहे शनिवारी लहानमोठ्या सरींनी पुन्हा हजेरी लावली. धरण परिसर, पाथरपुंज, निवळे, धनगरवाडा, चरण येथे दमदार पाऊस झाला.

चांदोली धरणात १० जून रोजी या वर्षीचा सर्वांत कमी १०.३० टीएमसी पाणीसाठा होता. हा साठा शनिवारी सकाळी सात वाजता १४.५२ टीएमसी झाला आहे. पाणीसाठ्यात ४.२२ टीएमसीने वाढ झाली आहे. ११ ते १७ जून वगळता धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. आतापर्यंत दोन टीएमसी पाणी धरणातून वारणा नदीपात्रात सोडण्यात आले आहे.

चांदोली धरण पाणलोट क्षेत्रातील पाऊस (कंसात एकूण पाऊस मिमीमध्ये)• चांदोली धरण १३० (१,६५३)• पाथरपुंज ५४ (१,५०८)• निवळे ४७ (७७२)• धनगरवाडा  ६५ (८६२)

चांदोली परिसरामध्ये संततधार कायमवारणावती: चांदोली परिसरामध्ये पावसाची संततधार कायम आहे. शनिवारी सकाळी ७ पर्यंतच्या २४ तासांत चांदोली परिसरात ६५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, एकूण पाऊस ८६२ मिलिमीटर झाला आहे. धरणाच्या पाण्याची पातळी ६०२.६० मीटर, तर पाणीसाठा ४११.२१० दशलक्ष घनमीटर आहे. धरणात १४.५२ टीएमसी पाणीसाठा आहे.

टॅग्स :धरणपाणीनदीशिराळापाऊस