Lokmat Agro >हवामान > कोकणात नद्यांना पूर; विदर्भात पुन्हा अतिवृष्टी, मराठवाडा कोरडाच

कोकणात नद्यांना पूर; विदर्भात पुन्हा अतिवृष्टी, मराठवाडा कोरडाच

Heavy rain in Maharashtra; red alert for mumbai; marathwada still depict of rain | कोकणात नद्यांना पूर; विदर्भात पुन्हा अतिवृष्टी, मराठवाडा कोरडाच

कोकणात नद्यांना पूर; विदर्भात पुन्हा अतिवृष्टी, मराठवाडा कोरडाच

गेले दोन दिवस मुसळधार पावसाने पालघर, ठाणे, मुंबईला चांगलेच झोडपून काढले. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात सलग ४८ तास मुसळधार सुरूच आहे.

गेले दोन दिवस मुसळधार पावसाने पालघर, ठाणे, मुंबईला चांगलेच झोडपून काढले. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात सलग ४८ तास मुसळधार सुरूच आहे.

शेअर :

Join us
Join usNext

मुंबई : संपूर्ण कोकणसह विदर्भात मुसळधार पाऊस सुरू असून, या प्रदेशात पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झाली आहे. विदर्भात वीज पडून ३१ महिला जखमी झाल्या आहेत. बहुतांशी जिल्ह्यांत संततधार पाऊस झाला असून, शुक्रवारी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मराठवाड्याच्या काही भागांत मात्र अद्याप पावसाची प्रतीक्षाच आहे. याशिवाय सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण परिसरातही पावसाची प्रतीक्षा आहे.

गेले दोन दिवस मुसळधार पावसाने पालघर, ठाणे, मुंबईला चांगलेच झोडपून काढले. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात सलग ४८ तास मुसळधार सुरूच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काजळी आणि बाव नद्यांनी धोका पातळी ओलांडली असून, जगबुडी, शास्त्री, कोदवली आणि मुचकुंदी या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. गुरुवार सकाळपासून कोसळणाच्या मुसळधार पावसाने मीरा भाईंदरमध्ये सर्वत्र पूरस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झाले.

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. सांगली जिल्ह्यातील वारणा (चांदोली) धरण क्षेत्रातही मुसळधार पाऊस सुरू आहे.

रविवारपर्यंत कोसळधारा
ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, शनिवारीही रायगड आणि पुणे हे दोन जिल्हे पावसाच्या रडारवर असून, रविवारनंतरच पावसाचा जोर किंचित कमी होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

कोयनेत ६४ टीएमसी साठा
कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. २४ तासांत नवजा येथे सर्वाधिक १८९ मिलिमीटरची नोंद झाली आहे. तर कोयना धरणातील साठा ६४ टीएमसी झाला असून, पायथा वीजगृहातील विसर्ग १०५० क् वाढणार आहे. नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मराठवाड्यात ठणठणाट
राज्यात सर्वत्र जोरदार पावसामुळे भरभराट होत असताना मराठवाड्यात ठणठणाट आहे. ५८ दिवसांत फक्त ४२ टक्के पाऊस झाला आहे. नांदेड जिल्ह्यात सरासरीच्या ५७ टक्के पाऊस झाला आहे. उर्वरित जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नाही.

सरासरीच्या १०४% पाऊस
मागील काही दिवसांपासून काही जिल्ह्यात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे राज्यात आतापर्यंत सरासरीच्या १०४ टक्के पाऊस झाला आहे. १७८ तालुक्यात सरासरीच्या १०० टक्क्यांपेक्षा जास्त, १३० तालुक्यात ७५ ते १०० टक्के आणि ५८ तालुक्यात ५० ते ७५ टक्के पाऊस झाला आहे.

पेरण्या ८५%
राज्यात १२० लाख ३७ हजार हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच सरासरीच्या ८५ टक्के पेरणी झाली आहे. यवतमाळ, जळगाव, बीड, नांदेड, बुलढाणा येथे अधिक पेरणी झाली असून सांगली, ठाणे, पुणे, सोलापूर, गडचिरोली येथे कमी पेरणी झाली आहे. सर्वाधिक पेरणी सोयाबीनची १११ टक्के आणि कापसाची ९६ टक्के झाली आहे.

यवतमाळला पुन्हा पूरस्थिती
गुरुवारी सकाळीही पावसाने झोडपल्याने यवतमाळसह जिल्ह्यातील राळेगावसह कळंब, वणी, घाटंजी आदी तालुक्यांत अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. नागपूर, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यालाही पावसाने झोडपले असून चंद्रपूर जिल्ह्यात वीज पडून ३१ महिला जखमी झाल्याची घटना घडली आहे.

पाणीसाठा वाढला
पुणे परिसरात पडणाच्या पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे.

Web Title: Heavy rain in Maharashtra; red alert for mumbai; marathwada still depict of rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.