राज्यात आज सकाळपासून ठिकठिकाणी जोरदार पाऊस सुरू झाला असून नागपुरात काल मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अवघ्या चार तासात 100 मिमीहून अधिक पाऊस झाला असून अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. परिणामी नदी, नाले, ओढे तुडुंब भरले आहेत. शहरात अनेक भागात पाणी साठले असून नागरिकांच्या घरात पाणी गेले आहे.
नागपूर शहरात काल रात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. नागपूर महापालिकेने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून घराबाहेर आवश्यक कामाशिवाय न पडण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. सखल भागात अडकलेल्या नागरिकांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत ट्विट केले आहे.
शुक्रवारी रात्रीपासून नागपूर शहरात मुसळधार पाऊस सुरू असून अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. चारचाकी, दुचाकी गाड्या वाहून जातानाचे दृश्य आहे. ढगफुटीसदृश्य पावसाने नद्यांना पूर आला आहे. घरे वाहने आणि दुकानांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
https://twitter.com/kunalmourya01/status/1705449665456476454
भारतीय हवामान विभागाने विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली होती. नागपूरसह काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्टही देण्यात आला होता. नागपूरमध्ये पुढील 24 तास पाऊस सुरू राहील. रडारच्या संकेतांनुसार नागपुरात आता मुसळधार ते अति मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. 80-100 मिमी ओलांडण्याची शक्यता आहे.
आज सकाळपासून राज्यात पावसाची स्थिती काय?
राज्यात विविध भागात पावसाचा जोर वाढत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. नाशिक मध्येही पावसाची रिपरिप सुरू असून नगर धाराशिव, नंदुरबार, कोल्हापूर, ठाणे , मुंबई येथेही आज सकाळपासून पावसाची हजेरी लागली आहे.
कुलाबा- ७७.० मिमी SRF-2240.3mm
परभणी-२५.६ मिमी. SRF- 571.6mm
रत्नागिरीमध्ये असा झाला पाऊस
खेड-5
लांजा-2
चिपळूण-4
देवरुख-7
राजापूर-2
मंडणगड-30
दापोली-2
गुहागर-5
जिल्हा - कोल्हापूर
गडहिंग्लज -3
शाहूवाडी-2
गगनबावडा-79
बीड जिल्हा
1)पाटोदा- 26
2)आष्टी- 26
3)धारूर--19
जळगांव जिल्हा
बोदवड-60
भडगाव-10
भुसावळ-2.4
चोपडा-3
मुक्ताईनगर-9