आर्द्रा नक्षत्राच्या शेवटच्या कालावधीत औरंगाबाद जिल्ह्यात चांगला पाऊस पडल्यानंतर पुनर्वसू नक्षत्राच्या आगमनालाही पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. गुरुवारी झालेल्या पावसाने सिल्लोड, सोयगाव तालुक्यांतील काही गावांमध्ये वाहतुकीवर परिणाम झाला होता. शिवाय अनेक गावशिवारांतील शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. शिवना परिसरात वाहतूक ठप्प झाली होती.
शिवना सिल्लोड तालुक्यातील शिवनासह परिसरात गुरुवारी (ता. ६) दुपारी तीन वाजेच्या सुमारास तासभर जोरदार पाऊस झाला. पावसाच्या पाण्यामुळे अजिंठा-बुलढाणा राज्य मार्गावर होंडा शोरूमसमोर पाणी साचले होते, तसेच शिवना-धोत्रा रस्त्यावरील गणपती मंदिराखालील पुलावरून पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक तासभर ठप्प होती. या भागातील पहिल्याच जोरदार पावसामुळे परिसरातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत.
चितेगाव परिसरात जोरदार पाऊस चितेगाव : परिसरात गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या आठ दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने अर्ध्या तासात सर्वत्र पाणीच पाणी करून टाकले. या पावसाने पिकांना जीवदान मिळाले आहे. चितेगाव परिसरातील बोकूड जळगाव, पांगरा, बाभूळगाव, गेवराई, गिरनेरा, म्हारोळा, फारोळा आदी भागांत जोरदार पाऊस पडला. पावसाअभावी खरीप हंगामातील सोयाबीन पिकाची पेरणी रखडली होती. गुरुवारी झालेल्या या दमदार पावसाने परिसरातील पेरणीला वेग येणार आहे.
नाचनवेल परिसरात दमदार पाऊस नाचनवेल : गुरुवारी रात्री आठ शेतकऱ्यांना या पावसाने काहीसा होते. दिलासा मिळाला. गेल्या दोन आठवड्यांपासून ठप्प असलेल्या शेतीकामांनाही आता वेग येणार आहे.
सोयगाव, जरंडी महसूल मंडळात गुरुवारी पावसाची तीव्रता अधिक होती. त्यामुळे शहरातील रस्त्यावर मोठ्या पैठण तालुक्यातील पाचोड परिसरात गुरुवारी दुपारी तासभर जोरदार पाऊस झाला. त्यामुळे मोसंबीच्या शेतात असे पाणी साचले होते.
सोयगावच्या जंगलातून येणारा नाला ओव्हरफ्लो झाल्याने नाल्याचे पाणी शहरात घुसले. त्यामुळे रस्त्यावर अशी स्थिती होती. सोयगावात तिसऱ्या दिवशीही पाऊस पाणी साचल्यामुळे शहरात घुसले. त्यामुळे तहसील परिसरात मोठ्याप्रमाणात पाणी जमा झाले होते. पावसाच्या पाण्याने अनेक शेतकऱ्यांचे शेतातील बंधारे वाहून गेले. त्यामुळे त्यांचे नुकसान झाले. जरंडी पाणी वाहून लागल्याने या मार्गावरील वाहतूक काहीवेळ ठप्प झाली होती.
सोयगाव शहरासह तालुक्यात प्रमाणात वाजेच्या सुमारास नाचनवेल परिसरात गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशीही नागरिकांना रहदारी करणे अवघड येथील खडकी नदीला सलग दुसऱ्यांदा वाडी शिवारातून येणाऱ्या पाणंद पावसाने दमदार हजेरी लावली. दुपारी तीन ते चार वाजेच्या सुमारास झाले होते. अशात सोयगावच्या पूर आला. त्यामुळे गावाचा तालुक्याशी रस्त्याचे पाणी या शाळेच्या आठही दावरवाडी परिसरातील नांदर, कोंदर, उगवण चांगली होणार आहे. त्यामुळे कोरडी गेल्यामुळे हवालदिल झालेल्या त्यामुळे शहरातील रस्ते जलमय झाले ओव्हरफ्लो झाल्याने या नाल्याचे पाणी सोयगाव-बनोटी रस्त्यावर पाणीच व गुरुवारीही या शाळेतील सर्व बुधवारी रात्री व गुरुवारी सकाळी ११ ते करण्यात येत आहे.
पाचोड परिसरात बुधवारनंतर गुरुवारीही जोरदार पाऊस झाल्या शेतात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. या पावसामुळे शेतकयांच्या खरीप हंगामाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. यावर्षी पावसाळा सुरु होऊन एक महिन्याचा कालावधी लोटला तरी पाऊस झाला नसल्याने पाचोड परिसरातील शेतकरी हवालदिल झाले होते.
बुधवारी दुपारी २ च्या सुमारास परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. जवळपास २ तास पावसाची संततधार सुरू होती. त्यानंतर रात्री रिमझिम पाऊस झाला. महसूल विभागाच्या नोंदीनुसार बुधवारी ३८.०३ मिमी पाऊस झाला आहे. त्यानंतर गुरुवारी सकाळी रिमझिम पाऊस झाला. दुपारी १२च्या सुमारास तासभर जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.