आज राज्याच्या पूर्वपट्ट्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून विदर्भापासून कोल्हापुरापर्यंतच्या भागात पावसाचा जोर वाढणार आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम ते वादळी वाऱ्याच्या पावसाची हजेरी लागणार आहे.
राज्यातील 14 जिल्ह्यांना पावसाचा यलो देण्यात आला असून उर्वरित राज्यांना हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मंगळवारपासून पावसाचा जोर कमी होणार असून पावसाची उघडीप कायम राहील असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
दरम्यान, काल कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. कोकणातील संगमेश्वर, देवरुख, वाकवली, पालदपूर, खेड, रत्नागिरी तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे व महाबळेश्वर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली होती. मराठवाड्यात उदगीर आणि चाकूर जिल्ह्यांमध्ये मध्यम सरींचा पाऊस झाला.
कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट?
कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव तसेच विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया, नागपूर,वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.