मराठवाड्यात एका बाजूला दुष्काळाचे चित्र दिसत असताना दुसऱ्या बाजूला नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याचे दिसत आहे. मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात असणारया ८९ महसूल मंडळात सर्वाधिक १८९ युनिट पावसाची नोंद झाली असून हिंगोली जिल्ह्यात २८ युनिट पाऊस सोडल्यास बाकी जिल्ह्यांमध्ये दुष्काळाचे सावट कायम असल्याचे कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. यावर्षी आधीच उशिरा आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केली खरी मात्र पावसाच्या वारंवार पडणाऱ्या खंडामुळे पिके कोमेजून जात असल्याचे चित्र मराठवाड्यात दिसत आहे.
मागील दहा वर्षांपासून मराठवाड्यात 2014- 2015 नंतर पर्जन्यमानाची टक्केवारीचा आलेख चढता असल्याचे दिसत असले तरी 2023 वर्षात पुन्हा एकदा पर्जन्यमान खालावल्याचे चित्र आहे.
वर्ष. सरासरी पर्जन्यमान. प्रत्यक्ष पर्जन्यमान
2012. 779. 538.28
2013. 779. 854.37
2014. 779. 414.03
2015. 779. 433.64
2016. 779. 879
2017. 779. 673.08
2018. 779. 501.74
2019. 779. 770.67
2020. 751. 951.05
2021. 751. 1097.88
2022. 751. 914.6
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांपैकी नांदेड जिल्ह्यात 109.56% पर्जन्यमान झाले असून त्यानंतर हिंगोली जिल्ह्यात 85.26% पर्जन्यमान झाले आहे. मराठवाड्यातील सर्व शेतकऱ्यांना पिके जगवण्याची चिंता असताना या दोन जिल्ह्यांमध्ये गेले दोन दिवस पाऊस झाल्याने काही अंशी दिलासा मिळाला आहे.