राज्यात या आठवड्यात पावसाचा जोर वाढणार असून गुरुवारपासून विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
बंगालच्या उपसागरावर पुढील २४ तासांत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून ते ओडिशा आणि उत्तर आंध्र किनारपट्टी ओलांडून उत्तर-पश्चिम दिशेने सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील ४,५ दिवस महाराष्ट्रासह मध्य भारतातील काही भागांत पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज भारतीय हवामान विभागाच्या पुणे विभागाचे प्रमुख के.एस.होसाळीकर यांनी वर्तवला आहे.
आज ( मंगळवार) जरी राज्यभर पावसाची उघडीप राहणार असली तरी बुधवारपासून विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय उद्या विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्टही देण्यात आला आहे. गुरुवारपासून विदर्भातून, मध्य महाराष्ट्र, कोकण व मराठवाडा असा पावसाचा पुढील चार दिवसांचा प्रवास असेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाने दिला पावसाचा अंदाज, आज 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
मराठवाड्यात कसा असेल पाऊस?
मराठवाडयात दिनांक 12 व 13 सप्टेंबर रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची, दिनांक 14 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली व जालना जिल्हयात काही ठिकाणी, दिनांक 15 सप्टेंबर रोजी नांदेड, परभणी, हिंगोली जिल्हयात बऱ्याच ठिकाणी, दिनांक 16 सप्टेंबर रोजी परभणी, लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्हयात बहुतांश ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्ये स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 15 सप्टेंबर रोजी औरंगाबाद व जालना जिल्हयात बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 16 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, हिंगोली व नांदेड जिल्हयात बहुतांश ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1701491268021600597
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 12 व 13 सप्टेंबर 23 रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
याशिवाय दिनांक 14 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली व जालना जिल्हयात काही ठिकाणी, दिनांक 15 सप्टेंबर रोजी नांदेड, परभणी, हिंगोली जिल्हयात बऱ्याच ठिकाणी, दिनांक 16 सप्टेंबर रोजी परभणी, लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्हयात बहुतांश ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना,विजांचा कडकडाट,वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
दिनांक 15 सप्टेंबर रोजी औरंगाबाद व जालना जिल्हयात बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 16 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, हिंगोली व नांदेड जिल्हयात बहुतांश ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.मराठवाडयात पुढील तीन दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 15 ते 21 सप्टेंबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 17 ते 23 सप्टेंबर 2023 दरम्यान कमाल तापमान, किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे.