Join us

Highest Rain पंचवीस वर्षांनंतर या जिल्ह्यात झाला रेकॉर्ड ब्रेक पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2024 12:32 PM

१७ वर्षांनंतर म्हणजे २००७ नंतर जिल्ह्यात यंदा जून महिन्यात दोनशे मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. २००७ मध्ये जून महिन्यात जिल्ह्यात एकूण २३६.५ मिमी पाऊस पडला होता, तर यंदा २२८.२ मिमी पाऊस पडला आहे.

सोलापूर : १७ वर्षांनंतर म्हणजे २००७ नंतर जिल्ह्यात यंदा जून महिन्यात दोनशे मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. २००७ मध्ये जून महिन्यात जिल्ह्यात एकूण २३६.५ मिमी पाऊस पडला होता, तर यंदा २२८.२ मिमी पाऊस पडला आहे. मागील २५ वर्षाच्या आकडेवारीवर नजर टाकली असता, अवघे दोन वर्षे दमदार पाऊस पडला आहे.

सोलापूर जिल्हात जून महिन्यात सरासरी १०२ मिमी पाऊस पडणे अपेक्षित आहे, म्हणजे जूनमध्ये १०२ मिमी पाऊस पडला, तर पुरेसा पाऊस झाला असे म्हणता येईल. जानेवारीनंतर कडक उन्हाळा सुरू होतो व मे महिन्यात, तर उन्हाची लाही-लाही होते.

त्यामुळे केवळ सरासरी इतका १०२ मिमी पाऊस पडला, तर जमीन थंड होत नाही व वातावरणात फार असा बदल होत नाही. मात्र, तीन-चार दिवस दमदार पाऊस पडला व काही दिवस हलक्या सरी कोसळत राहिल्या, तर हवेत गारवा तयार होतो.

यंदा जून महिन्यात पहिल्या पंधरवड्यात दमदार पावसाच्या धारांची २२२ टक्क्यांपेक्षा अधिक नोंद झाली आहे. २००० पासून म्हणजे मागील २५ वर्षात जून महिन्यात पडलेल्या पावसाच्या आकडेवारीवर नजर टाकली असता, यंदा व २००७ या वर्षी सरासरीच्या दुपटीहून अधिक पाऊस पडला आहे. या २५ वर्षांत तब्बल १५ वर्षे जून महिन्यात सरासरी १०२ मिमी पाऊस असताना, कमीतकमी १४ मिमी व अधिकाधिक ९० मिमी इतकाच पाऊस पडला आहे.

दहा वर्षांचा विचार केला, तर दोन वर्षे सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडतो. दोन वर्षे जेमतेम, तर दोन वर्षे अत्यल्प पाऊस पडतो. अलीकडे सर्व मंडळांत सारखाच किवा लगतच्या दोन मंडळांत पडलेल्या पावसात मोठी तफावत असते. पावसाचे ढग तयार झाले, तरी स्थानिक हवामान पोषक असेल तेथे चांगला पाऊस पडतो. - डॉ. लालासाहेब तांबडे, मुख्य शास्त्रज्ञ, सोलापूर विज्ञान केंद्र

असमान पाऊस पडत असल्याने शेती पिकांचे नियोजन करता येत नाही. मागील वर्षी सरासरीपेक्षा फारच कमी पाऊस पडला. कोणतेही पीक व्यवस्थित आले नाही. फळबागा, ऊस ही पिके काढून टाकावी लागली. आता यावर्षी चांगला पाऊस पडत असल्याने वार्षिक पीक घ्यावे म्हटले, तर पुढे आवश्यक पाऊस पडण्याची शाश्वती नाही. - पोपट भांगे, शेतकरी, वडाळा

अधिक वाचा: Ujani Dam उजनीच्या पाणी पातळीत संथगतीने वाढ

टॅग्स :पाऊससोलापूरशेतकरीशेती