Join us

Hingoli Heavy Rain : राज्यातील सर्वांत कमी सरासरी पाऊस पडलेल्या हिंगोलीत मागील दोन दिवसांपासून का पडतोय मुसळधार पाऊस?

By दत्ता लवांडे | Published: September 03, 2024 4:29 PM

Hingoli Heavy Rain and Flood : मागच्या तीन महिन्याची सरासरी विचारात घेतली तर हिंगोली जिल्ह्यात मान्सूनचा सर्वांत कमी पाऊस पडला आहे.

Marathawada Rain Updates :  मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत बैलपोळा सणाच्या पार्श्वभूमीवर जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे मराठवाड्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून पीके अक्षरशः पाण्यात वाहून गेली आहे. लोकांच्या घरातही पाणी शिरले असून जनावरे, चाऱ्याच्या गंजी, गाड्या आणि काही ठिकाणची घरेही वाहून गेल्याची माहिती आहे. 

एकंदरीत मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड आणि विदर्भातल यवतमाळ या भागांत पडलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पण मागील तीन महिन्याचा विचार केला तर केवळ राज्यातील हिंगोली जिल्ह्यांत मान्सूनचा सरासरी पाऊस सर्वांत कमी पडला आहे. पण मागील तीन ते चार दिवसांत येथे अचानक मुसळधार पाऊस पडत आहे. (HIngoli Disctrict Heavy Rain)

पिकांचे अतोनात नुकसानया पावसामुळे नद्या नाल्यांना पूर आला असून पिकांचे नुकसान झाले आहे. मराठवाड्यात मान्सूनच्या पावसानने काहीशी उशिरा हजेरी लावली होती त्यामुळे अनेक ठिकाणी उशिरा पेरण्या झाल्या होत्या. तर आता हाताशी आलेले पीक पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

बैलपोळाही नाही करता आला साजराशेतीसंस्कृतीमध्ये महत्त्वाचा आणि बळीराजा आपल्या सर्जा-राजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एकमेव दिवस म्हणजे बैलपोळा. पण ऐन पोळ्याच्या सणादिवशी आणि खांदेमळणीच्या दिवशी पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांना पोळ्याचा सणही साजरा करता आला नाही. 

नेमकं का पडला अचानक पाऊस? मागील काही दिवसांपासून बंगालच्या उपसागरात जास्त तीव्रता असलेले कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते. कमी दाबाचे क्षेत्र हे पावसासाठी अनुकुल असते. त्यानंतर हे कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रवास पश्चिमेकडे असल्याने दक्षिण ओडिसा, तेलंगणा, आंध्रप्रदेश या भागांतून विदर्भात केंद्रीत झाले होते. कमी दाबाचे क्षेत्र हे गोलाकार असते. त्या क्षेत्राच्या नैऋत्य दिशेला जास्तीत  जास्त पावसाची शक्यता असते. पाऊस पडलेला भाग हा कमी दाबाच्या क्षेत्राच्या नैऋत्येकडे होता त्यामुळे विदर्भातील यवतमाळ आणि मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड आणि परभणी या जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडला आहे." अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागातील अधिकारी डॉ. मेधा खोले यांनी दिली. (Maharashtra Rain and Flood Updates)

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीहवामान