Join us

पुरातन काळात जलव्यवस्थापन कसं विकसित झालं?

By मुक्ता सरदेशमुख | Published: June 02, 2024 4:26 PM

बारव, विहिरी, तलाव बांधले गेले, वाड्या-वस्त्यांमध्ये पाणी आलं, जगणं सुसह्य झालं...

डोंगर टेकड्यातील जलाशय जपावी|ती बांधून बळकट करावी ||उन्हाळ्यात सकळजनास द्यावी| जलसंजीवनी"

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जलसंवर्धनाबाबत या ओळी. डोंगर-दऱ्यात साठलेलं, झिरपलेलं पाणी साठवून पिण्याच्या पाण्याच्या गरजा पूर्ण होत गेल्या. नदीकाठी वसलेल्या गावांना भूजलाचा शोध लागला. विहिरी, बारवं बांधली गेली. पाण्याची गरज भागली. पुरातन काळापासून चालुक्य, राष्ट्रकूट, सातवाहन साम्राज्यापर्यंत संस्कृतीत लोकांची पाण्याची गरज वाढू लागली. कधी नदीचा सहारा तर कधी खडकातल्या साठलेल्या पाण्याचा आधार! गरज वाढली तशी जलव्यवस्थापनाची पद्धतही बदलली. आता एकरभर शेतात दोन तीन बोअर दिसू लागल्या आणि पाणीटंचाईने गावंच्या गावं तहानली.  इतिहासात कसं होतं जलव्यवस्थापन? ते कसं विकसित झालं? पाहूया..

 जगातल्या कोणत्याही प्रगत संस्कृतीचे नाव घेतले की तिच्या संबंधित नदीचा किंवा पाण्याचा स्त्रोत हा येतोच. मग हडप्पा मोहेंजोदारो मधील सिंधू सरस्वती नदी तर इराक - इजिप्त मधली नाईल नदीही पुढे येते. 

हजारो वर्षांपूर्वी माणूस जलस्त्रोतांच्या बाजूला वसाहत करून राहू लागला तेव्हा त्याला विहिरीच्या रूपात भूजलाचा शोध लागला. माणसाच्या वस्तीमध्ये पाणी आलं. जगणं सुसह्य झालं. आणि नदी सोडून माणूस इतर ठिकाणीही वसाहती करू लागला. आज भारतात हजारो वर्षांपूर्वीचे विहिरीचे अवशेष सापडतात. ऋग्वेदासह अनेक प्राचीन वाङ्मयात ही विहिरीचा उल्लेख आढळून येतो. मौर्य सातवाहन राज्याच्या काळातील विहिरी विटांनी बांधकाम केलेल्या अतिशय सुबक गोलाकार आकाराच्या असल्याचे पुरावेही आता आहेत.

बारवाचा शोध 

सहाव्या शतकाच्या शेवटी 12 वाचा शोध लागल्याचे सांगितलं जातं. त्या काळातील राजे सरदार आणि दानशूर व्यक्तींनी वसाहतींना पाणी देण्यासाठी व्यवस्था करून देण्यासाठी बारव बांधण्याचे काम करून दिलं. नंतर बारावांचा विकास होऊन दहाव्या शतकापासून बारवांच काम दगडाने केलं जाऊ लागलं. 

राष्ट्रकूट चालुक्य यादव यांच्या काळात मोठ्या वसाहतीत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणून मंदिर नदीच्या बाजूला बारवांच काम मोठ्या प्रमाणात झालं. महाराष्ट्रात बेसाल्ट खडकांचा वापर केलेली अनेक बार व आजही 30-400 वर्षांनंतर सुस्थितीत आहेत. 

उदाहरणार्थ सातारा खंडोबा मंदिर औरंगाबाद, लोणार बारव, घृष्णेश्वर येथील बारावा व परळी वैजनाथ, त्रंबकेश्वर, औंढा नागनाथ, कोल्हापूर, अंबड, लातूर, तुळजापूर या ठिकाणची बारव आजही वापरात आहेत.

विहिरींची खोली वाढतच गेली! 

दुष्काळी काळात पाण्याची तीव्रता जाणवली तशी विहिरींची खोली वाढत गेली. भूजल पातळी मागोमाग विहिरीची खोली वाढली त्यामुळे जुन्या विहिरी व बारवा कोरड्या झाल्या. आता अनेक शहरांमध्ये बारवांचा वापर कचरा टाकण्यासाठी केला जातो. आता बोअर आले तरी विहिरींचा अस्तित्व शाबूत आहे . 

इतिहासातील हजारो वर्षांपूर्वी पाणी नियोजनातील जगातील व भारतातील अनेक उदाहरणे आढळतात ज्यामध्ये सिंधू संस्कृतीच्या कालखंडात म्हणजे साडेचार ते पाच हजार वर्षांपूर्वीच्या पाणी जमा करण्याची पद्धती समोर येते . ज्यामध्ये छतावरील व जमिनीवरील पाणी जमा करणे आणि ते विशिष्ट साठ्यापर्यंत येणे , मोहेंजोदारो हडप्पा येथील उत्खननात आढळलेले जलस्थापनाचे पुरावे तसेच हजारो वर्षांपूर्वी रेन वॉटर हार्वेस्टिंग चा विचार करून बांधले गेलेले मंदिर , पुढील कित्येक वर्षपाणी पुरेल अशा रीतीने जल नियोजनासाठी खडकांमध्ये खोदलेल्या टाक्या व तलाव हा जलव्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण आहे .

सध्या राज्यभरात तापमान प्रचंड वाढले आहे. धरणे तळाला जाऊन पोहोचली आहेत. विहिरी आटल्या आहेत. एकूणच जलस्त्रोत कोरडे ठाक पडू लागले असताना पाणी वापराचे नियोजन हा प्रशासनापुढे आणि सरकार पुढे मोठा प्रश्न 'आ'वासून उभा आहे. अशा काळात पुरातन काळातील जलसंधारणाच्या या पद्धतींना पुढे वापरता येईल का? कोरड्या विहिरींचं पुर्नभरण होईल का? जलटंचाईच्या काळात या जून्या बारवांचे पुनरुज्जीवन होणार का? हा खरा प्रश्न.

टॅग्स :पाणीइतिहास